आत्मा मालिकचे डॉ. माने यांनी केलेल्या तातडीच्या उपचारामुळे महिलेस जीवदान
Dr. Atma Malik. Mane’s emergency surgery saves woman’s life
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Jan 2021, 19:00:00
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मामालिक रुग्णालयात वृषाली राजूळे ( ४०) या रुग्ण महिलेस दाखल करण्यात आले त्याची तातडीने दखल घेत डॉ. माने यांनी जवळपास एक तासाच्या आपल्या अनुभवाच्या जोरावर भूल न देता सहा लिटर दोनशे ग्रॅम पाणी बाहेर काढले अथक प्रयत्नानंतर या महिलेला विविध उपचार करून जीवदान दिले आहे.डॉ. माने हे रूपाली साठी देवदूतच ठरले असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांची झाल्याची माहिती रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी अमित फरताळे यांनी दिली.
सदर रुग्णास अति उच्च रक्त दाब हृदयाचे ठोके प्रचंड वाढलेली शरीर मोठ्या प्रमाणात फुगलेले अशा परिस्थितीत जंगली महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याआधी त्यांनी इतरत्र औषध उपचार केले होते. मात्र परिस्थिती बिकट झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना काही सुचेना मोठ्या धीराने आत्मा मालिक रुग्णालयात या महिलेस दाखल करण्यात आले होते.
तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक रुग्णालयात नवीन वर्षापासून मेडिकल डायरेक्टर म्हणून डॉक्टर अनिल माने हे नव्याने रुजू झालेले असून जवळपास 25 विविध डिग्री त्यांच्याकडे आहेत अत्यंत हुशार व अनुभवी असे ते डॉक्टर असून अमेरिकेसह पंधरा विविध देशातून तसेच विविध संस्थेतून त्यांनी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे डॉ. माने हे हार्ट अटॅक आलेल्या रुग्ण चालताना धाप लागणे, छातीत धडधड होणे छाती दुखणे, फुफ्फुसांचे आजार, मेंदूचे आजार, असिडिटी व पित्ताशयाचे आजार, साखरेचे आजार, लकवा भरणे, फेपरे येणे, अर्धांगवायु, मुतखड्याचे आजार, सर्पदंश झाल्यावर त्यावर विविध उपचार मिरगी येणे डायलेसीस रोड अक्सीडेंट आदी आजारावर प्रख्यात तज्ञ डॉ. अनिल माने हे रुग्णांना मार्गदर्शन उपचार करणार असल्याचेही अमित फरताळे यांनी सांगितले.
आत्मा मालिक रूग्णालयात हृदयरोग विभाग बालरोग विभाग युरो सर्जरी विभाग जनरल सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग आदी सर्व विभाग महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन वर्षापासून आत्मा मालिक रूग्णालयात रुग्णांना कमी खर्चात चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विविध उपचारासाठी आधुनिक यंत्रणा येथे बसवण्यात आली आहे नाशिक येथील एवर हेल्दी हॉस्पिटल आत्मा मालिक रुग्णालय चालवण्यासाठी घेतले आहे. येथे आधुनिक सोयी सुविधा रुग्णांसाठी विविध सेवा कार्यान्वित आहेत. गेल्या दीड वर्षापासून तालुक्यातील तसेच तालुक्यात बाहेरील रुग्णांना येथे अल्पदरात उपचार केले जात असून त्यात नवीन वर्षात आधुनिक पद्धतीने तसेच उत्तम प्रकारे सेवा मिळावी हा हेतू ठेवून डॉ. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या अधिपत्याखाली आता रुग्णालयाचे प्रशासन चालवले जाणार आहे.आत्मा मलिक रुग्णालयात अल्प दरात ॲन्जिओग्राफी,मोफत ॲन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया गुणवत्तापूर्ण हृदय उपचार जंतुसंसर्ग मुक्त हॉस्पिटल अद्ययावत अतिदक्षता विभाग स्वतंत्र हृदयशस्त्रक्रिया विभाग निर्जंतुक वातावरणामध्ये उपचार २४ x ७ अनुभवी हृदय उपचार तज्ञ, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळे केशरी आणि पांढरे रेशनकार्ड धारकांसाठी सर्व हृदय उपचार पूर्णपणे मोफत केले जातात असेही शेवटी फरताळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.