कोपरगावात ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहावर आरटीओची कार्यशाळा  

कोपरगावात ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहावर आरटीओची कार्यशाळा

RTO workshop on 32nd National Road Safety Week in Kopargaon

वाहन नियम पाळण्याची दिली शपथ

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9Feb 2021, 17:00

कोपरगाव : ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी (९) रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव महात्मा गांधी प्रदर्शन येथे मोटार वाहन निरीक्षक संदिप निमसे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी मो.वा. नि. संदिप निमसे यांनी मासिक कॅम्प दरम्यान कच्चे-पक्के लायसन, परवाने काढण्यासाठी आलेल्या मुला व मुलींना उपस्थित नागरिकांना आरटीओ प्रतिनिधी या सर्वांना मोटार वाहन अधिनियम, रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या नियमांच्या संदर्भात हेल्मेट-सीटबेल्ट, वेगवान, अल्पवयीन वाहन चालविणे, फिटनेस, परमिट, प्रदूषण तपासणी, प्रेशर हॉर्न / मल्टी ट्यून हॉर्न, उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नका, जादा वेगाने गाडी चालवू नका, वाहतुकीचे नियम व रस्ता सुरक्षा यांचे पालन करण्याचे वचन दिले. वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. त्यांनी दुचाकी चालविताना हेल्मेट बसविणे, मोटार चालवताना सीट बेल्ट, मद्यपान केल्यावर वाहन न चालविणे, परवाना जवळ ठेवणे, वाहनाची कागदपत्रे पूर्ण ठेवणे याविषयी अशा सूचना दिल्या. , वाहन परवाना, विमा आणि नोंदणी ठेवण्यासह नियमांची माहिती दिली. या उपस्थित सर्वांकडून वाहन नियमांचे पालन करण्याची शपथ वदवून घेतली. यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अर्चना फटांगरे या उपस्थित होत्या,

मुख्य रस्त्यावरील वाहनांना रिफ्लेक्टर लावताना मोटर वाहन निरीक्षक संदीप निमसे

दुपारी तीननंतर मुख्य रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रेडियम रिफ्लेक्टर बसवून रस्ता सुरक्षेसंदर्भात माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आज सायंकाळी पाच वाजता समृद्धी महामार्गावरील गायत्री कंपनीच्या सर्व वाहनधारकांची चालकांची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेला मोटर वाहन निरीक्षक संदीप निमसे यांनी मार्गदर्शन केले.

 अभियान यशस्वी करण्यासाठी जय जनार्दन मोटर ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी व अधश किरण मवाळ,  संतोष आहेर, दिपक काच्रिया, सुभाष लोढा व संजय वायखिंडे यांनी प्रिरिश्रम घेतले.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना १८ जानेवारीपासून सुरू झाला आहे . यावेळीची थीम “रस्ता सुरक्षा-जीवण रक्षा” ही आहे. त्याअंतर्गत एक महिना हा कार्यक्रम चालवून लोकांना जागरूक केले जाईल जेणेकरून ते सुरक्षित प्रवास करू शकतील.

Leave a Reply

You cannot copy content of this page