शिक्षिकेचा विनयभंग मुख्याध्यपकाविरुद्ध गुन्हा दाखल
Filed a case against the headmaster for molesting a teacher
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9Feb 2021, 16:00
शिर्डी : शिर्डी शहरातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत गेल्या पाच वर्षापासून नोकरी करत असलेल्या शिक्षिकेने मुख्याध्यापकाने आपला विनयभंग केल्याची तक्रार शिर्डी पोलीसात दिली आहे. या घटनेमुळे शिर्डी शहरात खळबळ उडाली आहे.
सदर शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुख्याध्यापक शिर्डी हा वेळोवेळी वाईट नजरेने बघणे कामाच्या ओघात शरीरं स्पर्श करणे कार्यालयात गेल्यावर वाईट हेतूने पकडणे अशी कृत्य करत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना देखील माहिती दिली होती. मात्र कठोर कारवाई न झाल्याने त्याचे धाडस वाढतच गेले ६ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वाजेच्या सुमारास ड्युटीवर असताना मुख्याध्यापकाने काम आहे, असे सांगत कार्यालयात बोलावले असता मोबाईल मधील अशील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली नकार दिला असता जबरदस्ती केली, मी मदतीसाठी ओळखीच्या शिक्षकेला विनंती केली असता त्यांनी देखील सरांना असे करू नका असे सांगितले त्यावेळी त्यांनी झालेला प्रकार कोणाला सांगितला तर संपवून टाकीन माझ्या राजकीय ओळखी फार आहे त्यामुळे कोणाला काही सांगू नका अशी सांगितले अशी तक्रार शिक्षिकेने शिर्डी पोलिसात दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ००६०भादवि ३५४अ,३५४ड, ५०६अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची गंभीर दखल शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी घेतली असून सदर महिलेने संपूर्ण घटनाक्रम वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला असता त्यावेळी ह्या महीलेला अश्रू अनावर झाले होते. शिर्डी पोलिसांनी या महिलेला पाठबळ देऊन आधार देत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले या घटनेचा तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैभव रुपवते हे करत आहेत.
या घटनेने शिर्डी परिसरात ही प्रचंड खळबळ उडाली आहे जर परीसरात कोणी सरकारी अथवा खाजगी नौकरी करत असलेल्या महिलांना त्रास देत असेल तर महिलांनी तक्रारार केली तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे जर त्रास होत असेल तर महिलांनी पुढे आले असे सांगितले.