विवेक कोल्हे यांच्या बिनविरोध जिल्हा बॅंक संचालकपदावर शिक्कामोर्तब, केवळ औपचारिकता बाकी

विवेक कोल्हे यांच्या बिनविरोध जिल्हा बॅंक संचालकपदावर शिक्कामोर्तब, केवळ औपचारिकता बाकी .

Vivek Kolhe unopposed as District Bank Director, only formalities left

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10Feb 2021, 17:00

कोपरगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी बँक असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बिनविरोध संचालक पदावर कोपरगाव औदयागिक वसाहतीचे चेअरमन विवेक बिपीनदादा कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून केवळ घोषणेची औपचारिकता बाकी.

कोपरगाव सेवा सोसायटी मतदार संघातून विवेक कोल्हे यांच्यासह सौ. अलकादेवी राजेंद्र जाधव, किसनराव चंद्रभान पाडेकर आणि देवेंद्र गोरख रोहमारे असे चार अर्ज दाखल करण्यात आले होते, पैकी वरील तिघांनी माघारी घेतल्याने या मतदारसंघातून विवेक कोल्हे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून आज ११ फेब्रुवारी पर्यंत
माघारीची अंतिम मुदत असल्याने आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव असलेल्या विवेक कोल्हे यांचे शिक्षण बी.ई.सिव्हील पर्यंत असून सद्यपरिस्थितीत ते कोपरगाव सहकारी औदयोगिक वसाहतीचे विद्यमान चेअरमन असून इंडियन फारमर्स फर्टिलायझर कोआॅपरेटिव्ह लिमिटेड, नवी दिल्ली या संस्थेवर जनरल बाॅडी विद्यमान सदस्य तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना,शेतकरी सहकारी संघ लि., संजीवनी सहकारी पतसंस्था लि.आदि संस्थाचे विद्यमान संचालक म्हणून ते कार्यरत आहे.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष (२० वर्ष) यांनी आजवर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. यानंतर आता विवेक कोल्हे यांच्या रूपाने जिल्हा बँकेत कोल्हे घराण्याची तिसरी पिढी पाऊल ठेवत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे विवेक कोल्हे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्या पाठोपाठ त्यांचे जिल्हा बँकेत बिनविरोध होणारे पदार्पण यामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले आहे.
अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील कल पाहता कुठल्याही राजकारणविरहित निवडणूक होऊन पुन्हा ना.बाळासाहेब थोरात गटाकडे सत्ता जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page