संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज- प. पू. अण्णासाहेब मोरे
It takes time to impart value education to kindergarteners to preserve the culture. E. Annasaheb More
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10Feb 2021, 18:00
कोपरगाव : भारतीय संस्कृती ही माता-भगिनीनी जिवंत ठेवलेली आहे. आगामी काळातही भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी बालगोपाळांना मुल्यशिक्षण देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा संस्कार केंद्राचे प्रमुख यांनी कोपरगाव येथे केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांनी कोपरगाव येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्रात मंगळवारी (९) रोजी सायंकाळी प्रशासकीय बैठक व ग्राम अभियान यावर अमृततुल्य हितगुज केले. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, युवा पिढी बिघडलेली नाही. आपण घडविण्यात कुठेतरी कमी पडलो आहाेत. सुसंस्कृत निर्व्यसनी युवा पिढी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे. तसे झाले तर घराघरात मनमनात आई-वडिलांचे महत्त्व राहील. त्यामुळे भावी पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. भारतीय संस्कृती आध्यात्मिकतेच्या माध्यमातून टिकवून ठेवली आहे. आर्थिक प्रगतीसाठी घरात श्रीयंत्र ठेवले पाहिजे. ज्या सेवेकऱ्यांनी नोटबंदीच्या काळात श्रीयंत्राचा वापर केला त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली नाही. उत्तम आरोग्यासाठी वनौषधी मृत्युंजय यंत्राचा वापर करावा. कर्करोगावर स्वामी समर्थ केंद्रातर्फे औषधी तयार करण्यात आल्या आहेत. या औषधांचे नियमित सेवन केल्यास जीभ, मेंदूचा कर्करोग इतर चार-पाच आजार एका महिन्यात बरे होतात. कृषी विभागाच्या योजनेचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. काळ काम वेळ यांचा समन्वय साधत ग्रंथांचे शुद्धीकरण केले त्यामुळे अध्यात्मात गुंतवून ठेवण्याची मोठी संधी मिळाली वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालयातील रचना असावी, असेही ते म्हणाले. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात दिन दुबळ्यापासुन तर सर्वधर्मियांचे हित जोपासले जाते. जगाच्या कल्याणासाठी हा सेवा मार्ग यशस्वीपणे सेवेकर्यांनी स्विकारला आहे. आज लोकांना भक्तीची मोठी भूक लागली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सेवेकरी जरी देश आणि जगात फिरले तरी कमी पडतील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात करोना काळात देखील अतिशय परोपकारी काम करण्यात आले आहे. आज या ठिकाणी समोर बसलेल्या प्रत्येक सेवेकरी हा कोरोनि योध्दा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केली.आजकाल मुलांना चांगले निपजणे, त्यांचे पालन पोषण करणे, त्यांना चांगल्या सवयी लावणे ह्यावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, समाजाचे, जात धर्मांचे प्रश्न, विवाह, शेती, आरोग्य, वास्तु, संस्कृतीचे पारंपारिक सण, घरातील देव्हारा, वास्तुशास्त्र, प्रश्नोत्तर, पांरपारीक शेती व्यवसाय यासारख्या विषयावर ह्यावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, तसेच आहारशास्त्र बिघडले आहे मसाल्याच्या घरातील मसाल्याच्या डब्यावर माता-भगिनी पीएचडी केली पाहिजे स्वामी भारतात कुठे फिरले? याची माहिती दिली. यावेळी शहराच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ॲड. जयंत जोशी यांनी केले.