माजी शहरप्रमुखाला खंडणी मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
A case has been registered against a former Shivarkar Shaharpramukh for demanding ransom
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10Feb 2021, 19:00
कोपरगाव : मेडीकल चालवणेबाबत हप्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये द्या, अन्यथा कोयत्याने जिवे ठार मारण्याची भिती घालून धमकी देत शिवसेनेच्या माजी शहरप्रमुखाला खंडणी मागणाऱ्याविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन संजय साऴवे (रा.गजानननगर) कोपरगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहे. याप्रकरणी भरत आसाराम मोरे प्रगती मेडीकल शाँपी (रा सप्तर्षीमऴा) कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मोरे सप्तर्षी मळा येथे त्यांची प्रगती मेडिकल शॉपी दुकान असून राहण्यासही त्याच परिसरात आहेत.
रविवारी सायंकाळी ७.४५ वा सुमारास मेडिकल मध्ये असताना त्याठिकाणी आरोपी सचिन संजय साऴवे मजकुर हा काऴे रंगाची दुचाकी क्र. एम. एच. १७ सि. ए. ४८६५ यावरून तेथे आला व त्याने फिर्यादीस त्याचे मेडीकल चालवणेबाबत हप्त्यापोटी दरमहा दहा हजार रुपये बलादग्राहण करणे करीता बऴजबरीने फिर्यादीचे मेडीकल मध्ये प्रवेश करुन हातातील लोखंडी कोयत्याने जिवे ठार मारण्याची भिती घातली व शिवीगाऴ करुन धमकी दिली आहे वगैरे मज फि वरुन बुधवारी १० रोजी दुपारी ३.४० वाजता गु.रजि.नं व कलम ४७/२०२१ भादवी कलम ३८७,४५२,५०४,५०६ प्रमाणे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा रजी दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी प्रभारी पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका. १७७७ डी. आर. तिकोणे हे अधिक तपास करीत आहेत.