शेतकरी कर्जमुक्ती व अनुदान रकमेसाठी जिल्हा बँकेने पाठपुरावा करावा-विवेक कोल्हे
District Bank should follow up for debt relief and subsidy for farmers – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 16March 2021, 19 :30
कोपरगाव : महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तालुक्यातील सुमारे २७५ शेतकरी आहेत तर नियमीत कर्जाची परत फेड करणारे १६ हजार ५७७ शेतकरी ५० अनुदानापासून वंचित आहे या लाभाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हा बँकेने शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ॲड. उदय शेळके यांचेकडे सोमवारी (१६) रोजी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटीत केली आहे.
विवेक कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्हा बॅंकेअंतर्गत तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी २७५ असुन त्यांना सुमारे ७ कोटी ६१ लाख ९६ हजार रूपये तर नियमीत कर्ज परतफेड करणारे १६ हजार ७५५ शेतकरी असुन त्यांना १०८ कोटी ५६ लाख रूपये मिळणार आहेत. त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे. त्यात कोरोनाचे संकट पुन्हा उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल, त्याकरीता जिल्हा बॅंकेमार्फत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी श्री कोल्हे यांनी केली.





