“ब्रेक द चैन” : सरकारने आधी व्यापा-यांना लॉक डाऊनचा भत्ता द्यावा, मगच दुकाने बंदचे आदेश द्यावे – काका कोयटे

“ब्रेक द चैन” : सरकारने आधी व्यापा-यांना लॉक डाऊनचा भत्ता द्यावा, मगच दुकाने बंदचे आदेश द्यावे – काका कोयटे

“Break the Chain”: Government should first give lockdown allowance to traders, then order closure of shops – Kaka Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9April 2021, 19:35 :00

कोपरगाव: ‘शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते, शेतकरी, उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते त्याला आमचा विरोध नाही परंतु छोट्या व्यापाऱ्यांना देखील लॉक डाऊन काळात लॉक डाऊन भत्ता सरकारने चालू करावा, मगच आम्हाला दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावे’. अशा भावना छोट्या व्यापाऱ्यांचे निषेध आंदोलन प्रसंगी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांनी व्यक्त केल्या.

महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. या शासनाचे धोरणाचे निषेधार्थ शुक्रवारी (९) रोजी सकाळी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या आवाहनानुसार कोपरगाव शहरातील दुकानदारांनी लॉकडाऊनच्या विरोधात घोषणा फलक हातात धरून, सविनय कायदे पालन करत तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता किंवा जमावबंदीचा भंग न करता आपापल्या दुकानासमोर निषेध फलक हातात धरून सविनय कायदे पालन करत अभिनव अशा स्वरूपाचे आंदोलन केले. ‘लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना महाराष्ट्र शासन मोठे उद्योजक, भांडवलदार, मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक, चित्रपट निर्माते यांच्याशी चर्चा केली, परंतु छोट्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. पुन्हा लॉकडाऊनच्या धोरणाचा आम्ही निषेध करीत आहोत’. असे अध्यक्ष काका कोयटे व कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले. यावेळी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी लॉकडाऊन परिपत्रकातील विसंगती बोट ठेवून लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी .अशी मागणी केली. छोट्या दुकानदारांकडे काम करणारे शेकडो कामगारांचा उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून असल्याने तेही निराधार झालेले आहे? याला जबाबदार कोण?’ अशा अनेक संतप्त प्रतिक्रिया दुकानदारांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी याबाबत फेरविचार करावा असे आवाहन व्यापारी महासंघाने केले. याप्रसंगी नरेंद्र कुर्लेकर, सत्येन मुंदडा, राजकुमार बंब, नारायणशेठ अग्रवाल,चांगदेव शिरोडे,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, स्टेशनरी असोसिएशनचे रमेश शिरोडे,उल्हास गवारे,निलेश मुंदडा,महावीर सोनी, तिलक अरोरा अकबर शेख अंकुश वाघ, शरद खरात आणि अनेक व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page