अजिंक्य मल्टीस्टेट सोसायटीने केला १२१ कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार- उत्तमराव औताडे

अजिंक्य मल्टीस्टेट सोसायटीने केला १२१ कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार- उत्तमराव औताडे

Ajinkya Multistate Society crosses Rs 121 crore joint venture – Uttamrao Autade

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 10April 2021, 12:35 :00

 कोपरगाव : संस्थेतील खातेधारकांची विश्वाससार्हता, ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास, खातेधारकांना दिली जाणारी तत्पर सेवा या घटकांवर उत्तर नगर जिल्यातील एकमेव रजिस्ट्रेशन असलेली अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली कोपरगाव येथील नामांकित अजिंक्य उत्तमराव औताडे मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी. यांनी नुकत्याच पार पडलेल्या २०२०-२०२१ आर्थिक वर्षात प्रगतीचे एक नवे शिखर गाठले असून स्थापनेपासून अवघ्या आठ वर्षात संस्थेने १२१.७७ कोटींचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा यशस्वी रित्या पार केला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव औताडे यांनी दिली.

उत्तमराव  औताडे म्हणाले, २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात संस्थेने कोरोना महामारी चे वातावरण असून हि एकूण ठेवींमध्ये ३०.१ कोटी रुपयांची वाढ झाली असून संस्थेच्या एकूण ठेवी ७१.७६ कोटी इतक्या झाल्या आहेत.संस्थेने उद्योजक,शेतकरी व लघु उद्योजकांना एकून ५०.१ कोटी चे कर्जवाटप केले असून संस्थेचा नेट एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात संस्थेने यश मिळविले आहे.त्याचप्रमाणे संस्थेची २४.१० कोटींची गुंतवणूक असून संस्थेला २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात ७८.४५ लाखांचा नफा झाला आहे. संस्थेची कोपरगाव येथे मुख्य शाखा आहे तर शिर्डी, राहाता व कोळपेवाडी या ठिकाणी ही शाखा कार्यरत आहेत. संस्थेने येत्या आगामी काळात ५ नवीन शाखा काढून खातेधारकांना सेवा देण्याचे नियोजन केले आहे.तसेच येत्या आर्थिक वर्षात १५० कोटी ठेवींचे उदिष्ट्य ठेवले आहे. संस्थेच्या प्रगतीत संस्थेचे सभासद, ठेवीदार, संचालक मंडळ, अध्यक्ष ,दैनिक ठेव प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग या सर्वांचे मौल्यवान योगदान आहे.अशी माहिती अध्यक्ष उत्तमराव औताडे यांनी दिली. या पुढे हि खातेधारक, ठेवीदार, कर्जदार याच्याकडून असेच सहकार्य आणि साथ संस्थेला मिळेल अशी अपेक्षा श्री. औताडे यांनी व्यक्त करून सर्व खातेधारक, ठेवीदार व कर्जदारांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page