राज्य सरकारने कांदयाला प्रतिक्विंटल ४०० रूपयाचे अनुदान दयावे.-सौ स्नेहलता कोल्हे

राज्य सरकारने कांदयाला प्रतिक्विंटल ४०० रूपयाचे अनुदान दयावे.-सौ स्नेहलता कोल्हे

State government should give subsidy of Rs. 400 per quintal to onion. – Mrs. Snehalta Kolhe

कृषीमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे मागणी Agriculture Minister Demand from Na. Dada Bhuse

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 9April 2021, 19:20 :00

कोपरगाव : कांदयाच्या दरातील मोठी घसरण पाहता कांदा उत्पादक शेतक-यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल ४०० रूपयेप्रमाणे अनुदान दयावे,अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे केली.

सौ कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांना दुबार बियाणे घेउन कांदा लागवड करावी लागली, त्यामुळे मोठया आर्थीक नुकसानीस सामोरे जावे लागले. सध्या कांदा पिकाच्या काढणीचे काम सुरू असुन कांदा हे नाशीवंत पिक असल्याने जास्त दिवस ठेवू शकत नाही. सध्या लाॅकडाउन सुरू असल्याने निर्बंध लावण्यात आले आहे. कांदा पिकाचे दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी बांधवापुढे मोठे आर्थीक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील सरकारच्या काळात कांदा उत्पादक शेतक-यांना अडचणीच्या काळामध्ये अनुदान देण्यात आले होते, त्याप्रमाणे या सरकारनेही शेतक-यांच्या अडचणींचा विचार करून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना प्रतिक्विंटल ४०० रूपये अनुदान दयावे, अशी मागणी त्यांनी राज्यात राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page