मधुमेह तज्ञ डॉ.रविंद्र किवळकर यांचे शुक्रवारी फेसबुक लाईव्ह व्याख्यान – काका कोयटे

मधुमेह तज्ञ डॉ.रविंद्र किवळकर यांचे शुक्रवारी फेसबुक लाईव्ह व्याख्यान – काका कोयटे

Diabetes expert Dr. Ravindra Kiwalkar’s Facebook live lecture on Friday – Kaka Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18May 2021, 16:32 :00

 कोपरगाव- कोरोना, मधुमेह व म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हा आजार होऊ नये म्हणुन काय दक्षता घ्यायची याबाबत शुक्रवारी दि.२१ मे रोजी पुण्याचे सुप्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ . रविंद्र किवळकर यांचे ऑनलाइन व्याख्यान आयोजित केल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

गत १ वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केले आहे. कोरोना हा आजार मधुमेही व्यक्तींमध्ये जलद गतीने फैलावतो. मधुमेही व्यक्तींची प्रतिकार शक्ती कमी असल्याने अशा व्यक्तींना कोरोनातून बरे व्हायला देखील उशीर लागू शकतो. त्यातच आता म्युकरमायकोसिस हा नवीन आजार आलेला आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव मधुमेही व्यक्तींमध्ये जलद गतीने डोळे, नाक, कान या मार्फत शरीरात फैलवु शकतो. या आजारात काही अवयव देखील निकामी होतात परंतु प्रसंगी प्राण देखील गमावण्याची शक्यता असते. या पार्श्वभूभीवर कशी काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन फिजिशियन व मधुमेह तज्ञ डॉ.रविंद्र किवळकर हे करणार आहेत. डॉ. किवळकर यांची देश विदेशात या विषयांवरील अनेक सेमिनारांना त्यांची उपस्थिती असल्याने या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. या ऑनलाइन व्याख्यानाप्रसंगी मधुमेह रुग्णांच्या शंकांचे समाधान देखील करण्यात येणार आहे. तसेच कोपरगावचे सुप्रसिध्द एम.डी.मेडीसीन फिजिशियन व हृदयरोग तज्ञ डॉ.गोवर्धन हुसळे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. गत ३५ वर्षापासून डॉ.किवळकर एम.डी.मेडीसीन फिजिशियन महाराष्ट्रात मधुमेह तज्ञ म्हणुन प्रसिद्ध आहे. त्यांचे अभ्यासाचा व ज्ञानाचा फायदा सर्वांना मिळण्याचे दृष्टीने समता नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने ‘समता पतसंस्था’ या नावाने फेसबुक लाईव्हवर शुक्रवार दि. २१ मे रोजी संध्याकाळी ५ वा. आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page