कोपरगाव पत्नीच्या खुनातील फरार आरोपीला पाच दिवसांत अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

कोपरगाव पत्नीच्या खुनातील फरार आरोपीला पाच दिवसांत अटक; तीन दिवसांची पोलिस कोठडी

Fugitive accused in Kopargaon wife’s murder arrested in five days; Three days in police custody

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 18May 2021, 20:20 :00

कोपरगाव : भांडणातुन पत्नीचा खून केला,व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करून  फरार झालेल्या विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी (रा मढी खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या पाच दिवसात अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून जिवे ठार मारल्याची घटना गुरूवारी (१३) राेजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली,त्यानंतर आरोपींनी तेथून पोबारा केला. सोमवारी (१७) रोजी त्याला लोणीकंद ता. हवेली जि. पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. मंगळवारी (१८) रोजी त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला गुरूवारी (२०) तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर चार्ज शिर्डी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोहेकॉ. इरफान शेख, पोकॉ. अंबादास वाघ, पोकॉ. रमेश झडे व सायबर सेल श्रीरामपूर येथील पोना. फुरखान शेख यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page