सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १८ विद्यार्थ्यांची निवड

सौ. सुशिलामाई काळे महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १८ विद्यार्थ्यांची निवड

 Selection of 18 students in campus interview at Sushilamai Kale College

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 24June :16:20

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्यु. सोसायटीच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये १८ विद्यार्थ्यांची आय.सी.आय.सी.आय. बँकेत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.

सौ. सुशिलामाई काळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर व एन आय आय टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्लेसमेंट ड्राइव्ह अंतर्गत कॅम्पस इंटरव्ह्यूचे आय.सी.आय.सी.आय. बँकेतील सिनिअर ऑफिसर या पदासाठी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी निवडीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी एकूण १८ विद्यार्थ्यांची निवड केली. या सर्व विद्यार्थ्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी नेमणूक करण्यात येणार होती. त्यापैकी काही उमेदवारांनी आपले ट्रेनिंग पूर्ण केले असून कु. सायली आढाव,  कु.शुभांगी गोरे, कु.मानसी क्षीरसागर या विद्यार्थिनींची आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या कल्याण शाखेत व कांचन वाबळे या विद्यार्थिनी कोपरगाव शाखेत सिनिअर ऑफिसर या पदावर नेमणूक करून या विद्यार्थिनी या ठिकाणी कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. मात्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होवून या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. त्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव सौ चैताली काळे व सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page