कोपरगाव बाजार समितीत डाळींब वधारले, कांदा भाव स्थिर शेतकरी समाधानी – संभाजी रक्ताटे
Pomegranate prices rise in Kopargaon market committee, onion prices stable, farmers satisfied – Sambhaji Raktate
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 23June :20.20
कोपरगाव : आज बुधवारी (२३ जुन )रोजी ४९६०क्विंटल आवक झाली, कोपरगाव बाजार समितीत १ नंबर कांदा एक हजार ९७६, २ नंबर १२५० ते १७५० गोल्टी ५०० ते १२००रुपये तर जोड कांदा २०० ते ८०० क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली आहे.तर डाळींब २४४ कॅरेट आवक झाली, कोपरगाव बाजार समितीत १ नंबर डाळिंब तीन हजार , २ नंबर १००० ते २००० रुपये तर ३ नंबर डाळींब ५०० ते ९५० क्विंटल या सरासरी भावाने डाळींब विक्री झाली असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली.
लॉकडाउनमधील निर्बंध उठल्यानंतर लिलाव सुरू झाल्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सरासरी एक हजार ३०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री सुरू झाली होती. डाळींब लिलाव सोमवार ते शनिवार , कांदा लिलाव मंगळवार ते शनिवार ,भुसार लिलाव सोमवार ते शनिवार शिरसगाव तिळवणी उपबाजार कांदा लिलाव रविवार, मंगळवार, गुरुवार,शुक्रवार व शनिवार होतो अशी माहिती उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली. आपल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी शेतीमालाची प्रतवारी करून आणावा असे आवाहन सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले आहे. राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये वरुणराजा धो-धो बरसणार, याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी यापूर्वीच वर्तविला आहे. या अंदाजाच्या अनुषंगाने यंदा सलग तिसऱ्या वर्षी उन्हाळ कांदा ‘भाव’ खाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर कांद्याच्या उन्हाळ साठवणुकीकडील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचवेळी बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या , व्यापाऱ्यांनीही उन्हाळ कांद्याची साठवणूक सुरू केली आहे.