स्थगिती ही तर मला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांची खेळी – विजय वहाडणे

 स्थगिती ही तर मला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांची खेळी – विजय वहाडणे

Postponement is a game played by the authorities so that I do not get credit-  Vijay Wahadne

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Tue 7July 19:20

कोपरगाव : उच्च न्यायालयाने २८ कामांना दिलेल्या स्थगितीवरून कोपरगाव शहरामध्ये राजकारण तापले आहे. मला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली असा घणाघात वहाडणेंनी केला आहे. सत्ताधाऱ्यांचा हा खटाटोप पाहून हास्यास्पद वाटत आहे. तसेच उच्च न्यायालयात जाऊन सत्ताधा-यांनी एकतर्फी म्हणणे मांडून घेतलेली स्थगिती लवकरच उठवू , अशी शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेनंतर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बुधवारी १२ वाजता पालिका सभागृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधा-यांवर चांगलाच हल्ला चढवला.

जिल्हाधिकारी यांनी २८ कामांना नव्हे तर विरोधकांनी विषय नंबर ११ चा ठरावाला दिलेली नामंजूरी तहकूब केली, असे असतानाही सत्ताधारी मात्र २८ कामांचा समावेश असलेल्याविषय क्रमांक ११ च तहकूब केल्याचे सांगतात. ते चक्क १०० टक्के खोटे बोलत आहेत, असा आरोप वहाडणे यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयातून २८ कामांना घेतलेल्या स्थगितीवरून कोपरगाव शहरामध्ये राजकारण तापले आहे.

अधिक माहिती देताना वहाडणे यांनी म्हटले की, मला श्रेय मिळू नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली, विकासकामे होऊ नये म्हणून या थराला ते  जातील असे वाटले नाही म्हणून आम्ही गाफील राहीलो, ४ वर्षे स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत यासाठी सहकार्य करणारे-गोड बोलणारे विधानसभा पराभवानंतर मात्र “शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर वहाडणेविरुद्ध बोलायचे काय? या भीतीने नेत्यांच्या आदेशानुसार विरोध करू लागले. असा आरोप त्यांनी केला.

विजय वहाडणे म्हणाले, मी पत्र देऊन सत्ताधारी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामाबाबत विचारणा केल्यावरही नेत्यांच्या दबावाखाली नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागातील कामे व्हावीत म्हणून आजतागायत उत्तरे दिली नाहीत, ८४ लाखांच्या गटारीचे काम आपल्या मर्जीतील़ व्यक्तीला मिळत नाही असे लक्षात आल्यावर यांचा विरोध सुरू झाला, खरे तर एस्टीमेट म्हणजे अंदाजपत्रक. काम पुर्ण झाल्यानंतर मोजमाप करूनच पेमेंट दिले जाते हे माहित असूनही कोल्हे गट वेड्याचे सोंग घेत आहे .स्विमिंग टॅन्कचे थडगे बांधणारे, स्वतःचे अतिक्रमण काढू नका यासाठी गयावया करणारे,वाटा मागण्यासाठी ठेकेदारांमागे फिरणारेच आमच्यावर बोलतात हेच आश्चर्य आहे.अशी टीका वहाडणे यांनी केली.

विजय वहाडणे यांना विचारलेले प्रश्न

 धारणगाव रोड व  इंदिरा पथ हे शहरातील दोन महत्त्वाचे रस्ते असताना ते का घेतले नाहीत,? तसेच गोकुळनगरी पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता डांबरीकरण करण्याबाबत विचारले असता यावर वहाडणे यांनी धारणगाव रस्त्याचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी एजन्सीकडे पाठविला आहे, तर इंदिरा पथ येथील नागरिकांच्या काही तक्रारी आहेत असे सांगून यावर फारसे बोलणे टाळले, साई तपोभुमी अण्णाभाऊ साठे हा रोड ब-यापैकी असताना थोडीशी डागडुजी करून निभावले असते तर मग त्यावर दहापट खर्च करण्याची काय आवश्यकता होती? यावर त्यांनी तो रस्ता करणे गरजेचे असल्याचे अनेक अर्ज आल्याने करावा लागला आहे असे उत्तर दिले. शहरात डांबरीकरण होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याबाबत छेडले, असता वहाडणे म्हणाले, ही कामे मागची असून पूर्वीच्याच दरामध्ये करून घेतली जात आहे. असे सांगून एक प्रकारे ठेकेदार कामे करून उपकारच करत असल्याची जाणीव करून दिली.

यावेळी वहाडणे म्हणाले,कोल्हे गटाचे ज्यांना बांधकाम परवानगी-पूर्णत्वाचे दाखले देतांना मुख्याधिकारी सरोदे यांनी किती पैसे घेतले हे त्यांनी सांगितले असते तर बरे झाले असते. सरोदे कोल्हे गटाला ते बधले नाहीत,यामुळेच त्यांच्यावर त्यांनी जातांना घाईघाईत वर्कऑर्डर दिल्याचा आरोप केला , मात्र या आरोपात तथ्य नाही, मला साथ दिली हेच त्यांचे मोठे पाप अशा शब्दात सरोदे यांची पाठराखण वहाडणे यांनी केली, निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत विरोध करायचा व कामेच होऊ द्यायची नाहीत हाच कोल्हे गटाचा डाव आहे. सव्वाशे कोटी च्या पाच नंबर साठवण तलावासाठी सव्वा कोटी लोकवर्गणी लवकरच भरणार असल्याचे वहाडणे यांनी शेवटी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page