आवर्तने चोरली, आणि पाणी नदीला सोडले हा तर निर्लज्जपणाचा कळस – सौ. स्नेहलता कोल्हे
The whirlwind stole, and the water released into the river is the culmination of shamelessness – Mrs. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 8July 16:30
कोपरगाव : शेतकऱ्यांची राखरांगोळी करून आवर्तने चोरली, पाणी नदीला सोडुन येथील बळीराजाबरोबर देशद्रोह केला आहे. त्यांना माफी नसावी, हा तर निर्लज्जपणाचा कळस असल्याची घणाघाती टिका भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केला .
सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, गोदावरी कालव्यांची सर्व सूत्रे कोपरगावच्या नेत्यांच्या हातात आहेत, निफाड तालुक्यातील काही गावे कालव्यांना जोडलेली आहेत,तर यावर्षी कोपरगावला मोठ्या गाजवाजात पाणी वाटप समितीची बैठक झाली, ना.भुजबळ पण होते, रब्बीसाठी दोन आवर्तन तर उन्हाळी तीन आवर्तने जाहीर करण्यात आली,मात्र रब्बीचे आवर्तन मार्चमध्ये तर उन्हाळी आवर्तन मे महिन्याच्या मध्यावर दिलं गेलं, बाकी आवर्तने चोरण्यात आले,असे त्यांनी स्पष्ट केले
सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,आवर्तनाचे पाणी चोरले आणि आता उरलेल्या पाण्याचे काय करायचे,कारण जास्त पाऊस आला तर धरण ओव्हरफ्लो होईल या भीतीने उरले सुरले पाणी टेस्टिंगच्या नावाखाली भर उन्हाळ्यात गोदावरी नदीला सोडले हा निर्लज्जपणाचा कळस नव्हे तर काय? ऐन दुष्काळात आवर्तनाचे पाणी चोरून लाखो लिटर पाणी वाया घालवून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले.याचा नेत्यांना व अधिका-यांना जरासुद्धा पश्चाताप नाही. थोडाही संकोच वाटत नाही हे विशेष.उलट आपण काही चूकीचे केले नाही, हे पाणी टेस्टिंगसाठी सोडण्यात आले असे सांगून आपल्या पापाचे उद्धटपणे समर्थनही केले आहे,एवढ्या मोठ्या नदीची टेस्टिंग घेतली जाते हे पहिल्यांदा कळले,असा खोचक टोला त्यांनी लगावला.
सौ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, शेतकऱ्यांची राखरांगोळी करून गोदावरी नदीत पाणी सोडणारे नक्कीच देशद्रोही आहेत त्यांनी बळीराजाबरोबर देशद्रोह केला आहे यांना माफी नसावी, कोपरगावात राजकीय नेते ऍक्टिव्ह आहेत असे बोलले जाते, मग नदी टेस्टिंग प्रकरणात शेतक-यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना ‘आता सगळे जण गप्प का आहेत?’ असा सवाल करत त्यानी लोकप्रतिनिधीवर निशाणा साधला आहे.
एक तर अजित पवार यांनी २००५ साली जागतिक बँकेकडून पैसे उकळण्यासाठी काही कारण नसतांना समन्यायी कायद्याचे भूत गोदावरी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या बोकांडी बसवले आहे,यावर्षी ओव्हरफलोने त्यांचे मिटले होते. मात्र आपण जास्तच उदार झालो आहोत, कायद्याच्या पलीकडे जाऊन दानधर्म सुरू केला आहे. याबाबत मी पाटबंधारे मंत्री आणि त्यांचा स्वीय सहाय्यक यांना व्हाट्सअप मेसेज केला,पाटबंधारे मंत्री यांच्या ई-मेल अकाउंट वर ई-मेल पण केला. मात्र त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही, साधा रिप्लाय देण्याचे औदार्य यांनी दाखवले नाही इतके असंवेदनशील आहेत, आता सांगा दाद कुणाकडे मागायची? असा संतप्त सवाल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला आहे.
चौकट
सोशल मीडियावर नांदूर-मधमेश्वर धरणातून चार वाजता गेट टेस्टिंग व तांत्रिक तपासणी साठी दहा ते वीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार नदीकाठी च्या लोकांनी सतर्क रहावे असा मेसेज व्हायरल झाला, तहसीलदार योगेश चंद्रे यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले पाटबंधारे विभागाकडून तसा मेसेज आला होता.
पाटबंधारे नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे
यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की नांदूर-मधमेश्वर धरणातून गेट टेस्टिंग साठी एक तासासाठी सहा हजार क्यूसेक्स पाणी दोन गेटमधून सोडण्यात आले होते व ते फार तर पाच किलोमीटर पर्यंत जाऊ शकेल अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. मात्र मात्र टेस्टिंग चे पाणी कोपरगाव पार करून पुढे गेले हे कसे ? याचा अर्थ ज्यादा क्यूसेस पाणी सोडले असा होतो काय? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
याबाबत बोलताना सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ म्हणाले,नांदूर-मधमेश्वर धरणातून गेट टेस्टिंग साठी एक तासासाठी सहा हजार क्यूसेक्स पाणी दोन गेटमधून सोडण्यात आले . सध्या पावसाचे कुठेच वातावरण नाही, तशी परिस्थिती ही नाही, पावसासाठी चातकासारखी शेतकरी वर्ग वाट पाहत आहे, गेट टेस्टिंग व तांत्रिक तपासणीच्या नावाखाली जनतेच्या भावनेशी खेळणे ही एक विकृतीच आहे.





