कोपरगावातील २९२ हक्काची घरकुले निधीअभावी अर्धवट – मंदार पहाडे
292 houses in Kopargaon due to lack of funds – Mandar Pahade
कोपरगाव : प्रत्येकाला हक्काचे घरकूल देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्याची पूर्तता केली जात आहे. मात्र, योजनेच्या खात्यावर पैसेच नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. कोपरगावातील २९२ हक्काच्या घरकुले अर्धवटच बांधून पडली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मंदार पहाडे यांनी केला.
गरिबांना हक्काचे घरकूल उभारण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली. या माध्यमातून घर बांधणीसाठी अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांची निवड शासन पातळीवरच केली जाते. कोपरगाव शहरामध्ये यात पाचशे लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.राज्य शासनाकडून मिळालेल्या प्रत्येकी एक लाख रुपये निधी मधून २९२ लाभार्थ्यांच्या घरकुलांचे काम अर्धवट झाले आहे. परंतु केंद्र शासनाकडून येणारे प्रत्येकी दीड लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेच्या खात्यावर निधी जमाच केलेला नाहीत. परिणामी लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. या पात्र लाभार्थ्यांचे हक्काचे घरकुल लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवकांनी आ. आशुतोष काळे यांच्यामार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू केला असल्याचे पहाडे यांनी सांगितले आहे. कोपरगाव नगरपरिषदेने देखील संबंधित विभागाशी प्रस्ताव पाठवून पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे,येत्या महिन्याभरात निधी उपलब्ध होईल अशी माहिती पालिका अभियंता अभियंता दिगंबर वाघ यांनी दिली.