कोपरगाव शहर विकासासाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे

कोपरगाव शहर विकासासाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे

5 crore fund sanctioned for Kopargaon city development: – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 30July 19:50

कोपरगाव: कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ५ कोटी निधी मंजूर केला असून आजपर्यंत कोपरगाव शहरासाठी दीडच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत १२ कोटी रुपये निधी महाविकास आघाडी सरकारकडून मिळविला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

त्या पाठपुराव्याची दखल घेत नगरविकास मंत्रालयाने यापूर्वीच शहरातील धारणगाव रोड विकसित करणे २ कोटी, प्रशासकीय इमारती समोरील बगीचा सुधारणा करणे १कोटी, प्रशासकीय इमारत कंपाऊंड करणे ५० लक्ष,  (बाजारतळ) स्मशानभूमी विकसित करणे १ कोटी, कोपरगाव शहरातील (मोहनीराजनगर) स्मशानभूमी विकसित करणे ५० लक्ष असा एकूण ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून नगरपरिषदेच्या इमारतीसाठी देखील दोन कोटी रुपये दिले, असून पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, शाळा दुरुस्ती, सभामंडप बांधणे, सिडी वर्क, कब्रस्थान,स्मशान भूमीच्या  विकास करून सोयी-सुविधा निर्माण करणे, सुशोभीकरन करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.                     विकासकामांसाठी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत पुन्हा एकदा ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे . कोपरगाव शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी माझा पाठपुरावा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले त्यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजीतदादा पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहे. शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.                 

    चौकट :-  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इतर प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावणार आहे – आ. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page