कोपरगावात चोरट्यांनी गोडाऊन लुटले, साडेआठ लाखाचा किराणा लंपास

कोपरगावात चोरट्यांनी गोडाऊन लुटले, साडेआठ लाखाचा किराणा लंपास

In Kopargaon, thieves looted godowns and groceries worth Rs 8.5 lakh

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Fri 30July 19:30

कोपरगाव : येवला रोड कोपरगाव येथील संतोष एजन्सी गोडाऊन अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लुटले. अवघ्या काही तासात चोरट्यांनी साबण, चहा, तेल, मसाले सह तब्बल आठ लाख सत्तर हजाराचा माल लंपास केला. या धाडसी चोरीमुळे खडबडून जागे झालेल्या शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

कोपरगाव शहरामध्ये मयुर संतोष कासलीवाल (३५) यांचे गावात किराणा दुकाने आहे. या दुकानांसाठी येवला रोड येथे गोडाऊन आहे. मंगळवारी २७ जुलै रोजी सायंकाळी सात ते बुधवारी २८ जुलै सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊन चे शटरचे कुलुन उघडुन गोडावुन मधील ५ लाख ६५ हजार रुपये किमतीचे त्यात संतुर साबण ६० बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये १२० साबण) लायफबॉय साबण १० बॉक्स लक्स साबण (प्रत्येकी बॉक्स मध्ये १२० साबण ) १०बॉक्स गोदरेज नं.१ साबण (प्रत्येकी बॉक्स मध्ये १२० साबण) १० बॉक्स डेटोल साबण१०बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १९२ साबण) एक्सपड साबण ७५ बॉक्स (प्रत्येकी बॉक्स मध्ये ७२ नग) ८६०००/- रु किचे सपट चहा ३५ बॉक्स (प्रत्येकी बॉक्स २२ किलो)
१०९००/- रु किचे २१बॉक्स कोकोनट ऑईल (प्रत्येकी बॉक्स १९ किलो) १०९३०० /- रु किचे त्यात एवरेस्ट मसाला १० बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १५ किलो) बडीसेफ ४बॉक्स(प्रत्येकीबॉक्स १५ किलो) जिरे १० बॉक्स (प्रत्येकी बॉक्स १५ किलो) सुपारी ८ बॅग (प्रत्यकी बॅग १५किलो)असा एकून ८,७०,०००/- रु येणे प्रमाणे चोरट्यांनी लंपास केला आहे केला असल्याची फिर्याद मयुर संतोष कासलीवाल यांनी दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून स्वतःपोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे तपास करीत आहेत .

Leave a Reply

You cannot copy content of this page