संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत व एक दिवसाची वैद्यकीय सेवा विवेक कोल्हे
Vivek Kolhe from Sanjeevani Yuva Pratishthan helps flood victims and provides one day medical service
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 31July 10:50
कोपरगाव : आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देत संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून चिपळून पूरग्रस्तांना मदत व एक दिवसाची वैद्यकीय सेवा देऊन अश्रू पुसण्याचा छोटासा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली
संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोपरगाव शहरातील प्रत्येक व्यक्ती उद्योजक कारखानदार सामाजिक संस्था लहान-सहान घटकांनी संजीवनी उद्योग समूह यांनी दिलेल्या पिण्याचे पाणी, विविध खाद्यपदार्थ, ब्लॅंकेट, महिलांसाठी साड्या, गरजेची वस्र, पुरुषांसाठी पोषाख, स्वेटर, मूखपट्ट्या, आदीं मदत साहित्यात आणखी भर टाकून दोन ट्रक मदत शुक्रवारी (३०जुलै) चिपळूनकडे रवाना करण्यासाठी संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी विधिवत पूजा करून झेंडा दाखवला. विवेक कोल्हे स्वहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करणार आहेत.
सिद्धार्थ साठे आढाव वासुदेव शिंदे व रवी रोहमारे यांनी प्रास्ताविक केले यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे रोहित कनगरे तळेगाव मळे येथील सिद्धेश्वर मित्रमंडळाचे गोरख बबन टूपके, गोरख पंढरीनाथ टुपके, त्यांचे सहकारी गौरव येवले, धनंजय नवले, सागर राऊत, नंदू केकान, सागर कोळपे, अजय शार्दुल आणि कार्यकर्ते सहभागी होते यावेळी दिलीप कोल्हे म्हणाले आपत्ती आणि संजीवनी उद्योग समूह कुटुंब यांची मदत हे एक समीकरणच झाले आहे मंत्री शंकरराव कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दाखवली बाजी भाजपा प्रदेश सचिव सन स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदत कार्य करण्यात येत आहे तो वसा पुढे चालविण्याचे कार्य संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या वतीने जागवूया ज्योत माणुसकीच्या भावनेतून आपण करीत आहे. यासह पुरामध्ये ज्यांची वाहने बंद पडली आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकही पाठवले असून साथीच्या आजारात मदत म्हणून डॉक्टर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय सेवा तपासणी कॅम्प लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
किल्लारी, गुजरात, कोल्हापूर, भूकंपात झालेल्या हानीच्या वेळेस युवा नेते बिपिन दादा कोल्हे यांनी जीवनावश्यक वस्तूंची थेट मदत केली होती. आज त्याच धर्तीवर संजीवनी युवा प्रतिष्ठानने कोल्हापूरकरा नंतर आता चिपळूणकरांना ही थेट मदतीचा हात दिला आहे.