सी.बी.एस.ई १२ बोर्ड परीक्षेत महर्षीची सिद्धी लोढा ९६ % गुण मिळवून तालुक्यात प्रथम

सी.बी.एस.ई १२ बोर्ड परीक्षेत महर्षीची सिद्धी लोढा ९६ % गुण मिळवून तालुक्यात प्रथम

Maharshi’s Siddhi Lodha 96% in CBSE 12 Board Examination First in the taluka

१२ वी निकाल १००%12th result 100%

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sat 31July 13:10

कोपरगाव : दिल्ली सी.बी.एस.ई १२ बोर्ड परीक्षेत संत जनार्दन स्वामी महर्षी विद्या मंदिरची सिद्धी पंकज लोढा (सायन्स) ९६ % गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे,तर बारावी कॉमर्स मध्ये आदिती दीपक पवार (७२.०२%) गुण मिळवून प्रथम आली आहे. विद्यालयाच्या १२ वीच्या सायन्स व कॉमर्सच्या दहाव्या बॅचने शंभर टक्के निकालाची आपली परंपरा  यावर्षीही कायम राखली आहे.

बारावी सायन्स प्रथम क्रमांक सिद्धी पंकज लोढा (९६%), द्वितीय क्रमांक श्रेयस संजय बानकर (९०%) तृतीय क्रमांक खुशी अजित पारख (८३.०२%), वैष्णवी नंदू पाठक (८३.०२%), या दोघींनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यावर्षी बारावी साठी २१ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते ते सर्वच्या सर्व चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक मोहनराव चव्हाण सर्व विश्वस्त व प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ. जे.के. दरेकर सर्व शिक्षक व पालक यांनी अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना जयप्रकाश पांण्डेय, स्वनील पाटील, बाळासाहेब बढे, रविंद्र कोहकडे, राहुल काशिद, सौ. अनिता वरकड, सौ. निकीता गुजराथी, कैलास कुलकर्णी, आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page