संजीवनी अकॅडमीची कु. ऋतुजा सोळुंकेला झाशीची राणी लक्ष्मीबाई भुमिकेसाठी राज्यात प्रथम
Sanjeevani Academy. Rituja Solunkela first in the state for the role of Rani Lakshmibai of Jhansi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Sun 1 August 19:10
कोपरगाव : इनटॅब संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित ऑनलाइन युट्युब फेसबुक माध्यमातून चॅनेलवर कला सादरीकरण स्पर्धेत संजीवनी अकॅडमीची विद्यार्थिनी कु. ऋतुजा राजेंद्र सोळुंके, कोपरगांव हिने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
नुकतेच इनटॅब संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन युट्युब फेसबुक माध्यमातून चॅनेलवर कला सादरीकरण स्पर्धेत कु. ऋतुजा राजेंद्र सोळुंके हिने झाशीची राणी लक्ष्मीबाई भुमिका प्रात्यक्षिकासह उत्कृष्टरित्या सादरीकरण केले होते . या स्पर्धेसाठी गुजरात,पुणे, दिल्ली, केरळ अश्या राज्यातील विविध भागातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतातील टॉप ५० शाळा व कनिष्ट महाविद्यालयात झालेल्या स्पर्धेत संजीवनी अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले होते. कु ऋतुजा सोळुंकेला हिने केलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेला सर्वाधिक मते पडल्याने संस्थेच्या वतीने तिला प्रथम क्रमांक देण्यात आला.माजी सभापती अनुसया होन यांची नात आहे. तिच्या या यशाबद्दल संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे व प्राचार्य सौ. सुंदरी सुब्रमण्यम शिक्षकवृंद रोहीदास होन, अनुसया होन, सुधाकर होन यांनी अभिनंदन केले आहे. चांदेकसारे, जेऊर कुंभारी पंचक्रोशीतून तिचे कौतुक होत आहे.





