कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कोल्हे गटाचे अरिफ कुरेशी बिनविरोध
Kolhe Group’s Arif Qureshi unopposed as Deputy Mayor of Kopergaon Municipality
कोल्हे गटाने मुस्लिम समाजाला दिलेल्या संधीचे सोने करू- कुरेशी. Let’s make gold of the opportunity given to the Muslim community by the Kohle group- Qureshi.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 4 August 17:30
कोपरगांव: कोपरगांव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपा कोल्हे गटाचे मुस्लीम समाजाचे अरिफ करीम कुरेशी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. त्यांचे मावळते उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कार केला निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी म्हणांले की, कोल्हे कुटुंबियांचे सामाजिक कामाचे मुस्लिम समाजावर ऋण मोठे आहे, वडील स्व. करीम कुरेशी यांच्या एकनिष्ठतेचे फळ त्यांच्यारूपांने आपणांस मिळाले असल्यांने माजीमंत्री शंकरराव कोल्हे, अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, सर्व नगरसेवक पदाधिकारी व युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शर्नांखाली काम करून शहर विकासात नागरिकांच्या संकल्पना पुर्ण करण्यांचा प्रामाणिक प्रयत्न करू. मुस्लीम समाजाला कोल्हे कुटुंबीयांनी दिलेले पाठबळ आपण कदापीही विसरणार नाही, पालिकेसह शहरात भाजपा व कोल्हे गटाची ताकद वाढवुन अपेक्षीत ध्येय गाठू, मुस्लिम समाजाच्या संकटकाळात कोल्हे कुटुंबीयांनी खंबीरपणे दिलेली साथ मोलाची आहे, या ऋणातून उतराई होण्यासाठी शहर विकासाची जास्तीत जास्त कामे करून तो प्रयत्न करू असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या या निवडीकामी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दिलीप दारूणकर, केशव भवर, अतुल काले, गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल, कैलास जाधव, संजीवनीचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, बाळासाहेब संधान, बाळासाहेब नरोडे, प्रदीप नवले, आधीच सेना-भाजपचे सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आदिंनी विशेष सहकार्य केले.
शहर विस्तारीकरण मोठया प्रमाणांत होत असल्यांने नागरिकांच्या गरजा वाढत आहे त्याप्रमाणे विकासकामात सातत्य ठेवुन शहर विकास साधावा अशी अपेक्षा जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली.
माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याचा उल्लेख केला. शेवटी गटनेते रविंद्र पाठक यांनी आभार मानले.