आमदार काळेंच्या आवाहनाला प्रतिसाद कार्यकर्त्यांची पूरग्रस्तांना मदत

आमदार काळेंच्या आवाहनाला प्रतिसाद कार्यकर्त्यांची पूरग्रस्तांना मदत

Activists respond to MLA Kale’s call to help flood victims

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Wed 4 August 17:50

 कोपरगाव : आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रमाला फाटा देऊन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे सुपूर्द केला.

आ. आशुतोष काळे यांचा ४ ऑगस्ट रोजी वाढदिवस  असतो. कोरोना संकट कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आदि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराचा हजारो कुटुंबाना फटका बसला असून शेती, व्यापार, उद्योग व घरांचे मोठे नुकसान झाले आहे या धर्तीवर शासन त्यांच्या परीने सर्वोतोपरी मदत देखिल करणार आहे. मात्र सामाजिक बांधिलकीतून प्रत्येकाची पूरग्रस्त बांधवांना मदत झाली पाहिजे या भावनेतून आ. आशुतोष काळे यांनी आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून डिजिटल फलक हार, फुले यावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन कार्यकर्त्यांनी तो पैसा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा असे आवाहन केले होते यावेळी फकीरमामू कुरेशी, चंद्रशेखर म्हस्के, मौलाना मुख्तार, मौलाना हाजी बशीर, हाजी मोसिम आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page