शंकराच्या रुपातील गजाननाचा आनंद हरपला- कोल्हे.

शंकराच्या रुपातील गजाननाचा आनंद हरपला- कोल्हे.

The joy of Gajanan in the form of Lord Shiva was lost- Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 17:50

कोपरगाव:  श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे अध्यक्ष शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निधनाने शंकराच्या रुपातील गजाननाचा आनंद हरपला असून जागतिक स्तरावर शेगाव गजानन महाराज संस्थान नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता,

त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षांपासून सेवा आणि शिस्तीचा मूलमंत्र सर्वार्थाने सार्थ ठरवला  अशा शब्दात श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे  यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.   सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनीही शिवशंकर पाटलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.            

श्री. शंकरराव कोल्हे पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तिरुपती बालाजी देवस्थान नंतर श्री साईबाबा संस्थान शिर्डी देवस्थानचा क्रमांक लागतो.,  येथील साईभक्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधा संदर्भात शिवशंकर पाटील नेहमीच संपर्क ठेवून असायचे.,   शिवशंकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानातून अत्यंत कमी पैशात शेगाव परिसरात आनंद सागर प्रकल्प उभा करून त्याद्वारे गजानन भक्तांना सुविधा पुरवल्या.   असाच प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून साई भक्तांसाठी काय करता येईल या बाबत आम्ही सर्व तत्कालीन विश्वस्तांनी गजानन महाराज देवस्थान शेगावला भेट देऊन तेथील सर्व प्रकल्पांची माहिती घेतली होती.  शिवशंकर पाटलांनी अत्यंत विश्वासाने गजानन महाराज संस्थानची धुरा सांभाळत येथील विकासात मोलाचे योगदान दिले त्यांच्या अकाली जाण्याने गजाननाचा आनंद आपल्यातून निघून गेला आहे अशा शब्दात शंकरराव कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page