बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वपुर्ण – डाॅ. डी. एस. मुळे
It is important to inculcate democratic values in childhood – Dr. D. S. Mule संजीवनी अकॅडमीमध्ये लोकशाही पध्दतीने विद्यार्थी समितीची निवड Selection of Student Committee in Sanjeevani Academy in a democratic manner
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 18:00
कोपरगांवः देशाच्या प्रगतीमध्ये लोकशाही मुल्यांना अनन्य साधारण महत्व आहे. त्या मुल्यांची रूजवण शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर झाल्यास उद्याचे सुज्ञ मतदार तयार होवुन लोकशाही पध्दतीला बळकटी येवुन देश प्रगतीपथाच्या मार्गावर आहेच परंतु अधिकची गतिमानता येईल. या अनुषंगाने संजीवनी अकॅडमीने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी लोकशाही पध्दतीचा अवलंब करीत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी समिती निवडून बालवयातच लोकशाही मुल्यांची रूजवण महत्वाची असते, या विचार धारेला महत्व दिले, असे प्रतिपादन कोपरगांव येथिल नामवंत डाॅक्टर डी. एस. मुळे यांनी केले.
संजीवनी अकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शालेय कामकाज चालविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी परिषद मंडळ निवडण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपुर्वक आमंत्रित करून त्यांना पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी भुषविले. यावेळी डाॅ. मुळे यांच्या पत्नी सौ. सुनिता मुळे, सौ. मनाली कोल्हे, सर्व निवड झालेले विद्यार्थी, प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम आणि शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन डाॅ. मुळे बोलत होते. तसेच उपप्राचार्य विलास बागडे, हेड मिस्ट्रेस माला मोरे हेही उपस्थित होते. या निवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन मनस्वी विजय नरोडे हीची निवड झाली तर उपप्रतिनिधी पदावर आदिती बानेश गायकवाड हीची निवड झाली. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करून त्या गटांमार्फत विविध ऊपक्रम राबविवण्यात येतात. या गटांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्यांची नावे देण्यात आली आहेत. या गटांसाठीही कॅप्टन व व्हाईस कॅप्टनच्या निवडी करण्यात आल्या आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे. अनुक्रमे कॅप्टन व व्हाईस कॅप्टन. प्रतापगड-अरूंधती किरण सुराळकर, नमन राहुल चंडालिया, रायगड-प्रणव हेमंत वन्ने, चार्वी योगेश कोठारी, सिंहगड-इशिता अनिल बनसोडे, देवाशिष विशाल खैरणार, तोरणागड- आदित्य बाळासाहेब खर्डे, आदिती सुर्यभान कोळपे. तसेच स्कूल मध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी पुढे येवुन नेतृत्व गुण सिध्द करतात आणि आपल्यातील सृजनशिलते मधुन विद्यार्थी समुहाला पुढे नेत उपक्रम यशस्वी करतात. अशा क्रिएटिव्ह टीम हेड म्हणुन आरती अनिल कारवा, स्पोर्ट्स कॅप्टन पदी क्षितिज दिलीप चिने, कल्चरल हेड पदी अनुश्री योगेश बनकर व परीमल दत्तात्रय आदिक यांची निवड करण्यात आली. या छोटेखानी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातुन चालु शैक्षणिक वर्षातील कोविड – १९ चे मार्गदर्शक तत्वे सांभाळत पुढील नियोजनाबाबत संकल्पना मांडल्या. यावर डाॅ. मुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगीतले की या विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभासंपन्नते बरोबरच उत्कृष्ट वर्कृत्व गुण आहे. ज्यांच्याकडे वर्कृत्व असते त्यांच्याकडे नेतृत्व येवुन त्यांच्या हातुन भविष्यात दातृत्वही अंगिकारले जाते. विद्यार्थ्यांचे अशा प्रकारचे यश म्हणजे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सर्वगुण संपन्न पिढीचे पाहीलेल्या स्वप्नांना, संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संचालिका सौ. कोल्हे यांचे मार्फत मिळत असलेल्या बळकटीचे प्रतिबिंब आहे. सर्व विद्यार्थी परिषद मंडळातील सदस्यांचे स्कूलच्या वतीने अभिंनदन करण्यात आले. निवडणुक अधिकारी म्हणुन विरूपक्ष रेड्डी यांनी काम पाहीले.