सीबीएसई १० वी सलग पाचव्या वर्षी जिल्ह्यात पुन्हा समता पॅटर्नचा डंका
CBSE 10th for the fifth year in a row Samata pattern again in the district
कोपरगाव: सी.बी.एस. ई.चा इयत्ता १०वी चा निकाल नुकताच जाहीर झाला असून १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. अविक शिवांकर मंडल ( ९८%)प्रथम, पूर्वा सचिन कोठारी (९७.०८%) द्वितीय तर समृद्धी विष्णु दावभट ( ९७ %) गुण मिळवून तृतीय आली आहे. संताच्या सर्वच्या सर्व ७७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण येण्याचा उच्चांक केला असून यात अविक मंडल,पूर्वा कोठारी, समृद्धी दावभट,मेधा शहा, पौरवी रहाणे या पाच जणांनी ९५% गुण मिळवले आहे तर ४२ जणांनी ८० ते ९० % गुण मिळविले असून उर्वरित ३० जणांनी ६० ते ८० % गुण मिळवून सलग पाचव्या वर्षी जिल्ह्यामध्ये सीबीएसई १० वी समता पॅटर्न चा डंका वाजविला आहे.

इंग्रजीत अविक मंडल, पूर्वा कोठारी, रुजुल रोहमारे, यांनी १०० पैकी ९७ गुण, हिंदीत समृद्धी दावभट हिने १०० पैकी १०० गुण, गणितात अविक मंडल, पूर्वा कोठारी, मेधा शहा यांनी १०० पैकी ९९ गुण, विज्ञानात अविक मंडल १०० पैकी ९७ गुण तर समाजशास्त्रात पूर्वा कोठारी हिने १०० पैकी ९९ गुण मिळविले आहे. निधीशा आव्हाड, सिद्धी शिंगी, श्रेया आढाव, तनिषा लुटे, स्नेहल पाटील, दिग्विजय ताडगे, अंजली भामरे, श्रेयस भोसले, वंश चावला, अदिती पटारे, तुलसी न्याती, नक्षत्र ठाणगे, तन्वी वाबळे, नेहा मुंजे, तन्वी लालसरे, रुजुल रोहमारे, रुपेश डहाळे, निष्ठा भुसारी, अद्वैत मापारी, सुचिता पवार, अक्षत ठोळे, अभिनंदन बंगाळ, अथर्व भाकरे या विद्यार्थ्यांनी ९० टक्के च्या पुढे गुण मिळवत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावारूपाला आलेल्या ‘समता इंटरनॅशनल स्कूल सलग ५ व्या वर्षात जिल्ह्यात अग्रगण्य राहण्याची परंपरा राखत पुनः एकदा समता पॅटर्न यशस्वी करून कोरोना काळात सर्व मानसिक दडपण झुगारून विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी मारली त्याचे गौरवोद्गार समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे यांनी केले.
सौ.स्वाती कोयटे पुढे म्हणाल्या, अभ्यासक्रमाबरोबरच विविध उपक्रम राबवीत असतो. इयत्ता पहिली पासूनच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असतात. तसेच इयत्ता १०वी ला आल्यानंतर गरजेनुसार गुणवत्तेनुसार शैक्षणिक, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मार्गदर्शनामुळे समता स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचेच फळ असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.समीर अत्तार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी सर्व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





