पोस्टातील टपाल पॅकर गोरडे यांनी रोकडची बॅग परत देऊन बक्षीसही नाकारले

पोस्टातील टपाल पॅकर गोरडे यांनी रोकडची बॅग परत देऊन बक्षीसही नाकारले

Gorde, a postal packer at the post office, returned the bag of cash and refused the prize

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 18:40

कोपरगाव : येथील पोस्ट ऑफिस मधील टपाल पॅकर सुधाकर गोरडे यांना सुमारे १३ हजार रुपये रोख रक्कम असलेली शिंगणापूर येथील पोस्ट विमा एजंट भाऊसाहेब दंडवते यांची तेरा हजार रुपये रोख रकमेची पैशाची पिशवी काऊंटरवर आढळून आली ती त्यांनी प्रामाणिकपणे पोस्ट मास्तर राजेंद्र नानकर डाक आवेशक संजय ढेपले यांच्याकडे  सुपूर्त केली.

त्यांनी याबाबत दंडवते चौकशी करून त्यांना ती  साभार परत केली गोरडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांनी गोरडे यांना दिलेली बक्षिसाची एक हजाराची रक्कमही गोरडे यांनी नाकारले याबाबतची अधिक माहिती अशी सोमवारी दंडवते हे कोपरगाव पोस्ट ऑफिस मध्ये आले होते त्यांचेकडे असलेल्या पिशवीत १३ हजार रुपयांची रोख रक्कम होती काऊंटर वरच विसरून गेले सायंकाळी पोस्ट कार्यालय बंद करतेवेळी ती पैशाची पिशवी सुधाकर गोरडे श्रावण बनसोडे यांच्या निदर्शनास आली  त्यांनी पोस्ट मास्तर नानकर यांचेकडे देऊ केली  त्या पैशाची व पिशवीची खातरजमा झाल्यावर दंडवते यांना ती साभार परत करण्यात आली या कामगिरीबद्दल विभागीय निरीक्षक विनायक शिंदे यांच्या हस्ते गोरडे यांचा सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे गोरडे येत्या आठ ऑगस्ट  रोजी ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त होत आहे. गोरडे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत असून अर्जुन मोरे रवींद्र परदेशी सोपान गडाख सोमनाथ गवारी शैलेश शीलवंत राहुल गजरे आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page