संघर्षातून  जीवन समृध्द करता येते -देसले

संघर्षातून  जीवन समृध्द करता येते -देसले

Life can be enriched through struggle –  Desale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 18:30

कोपरगांव: मानवावर संकटे येतात, जातात, संकटांमुळे खचुन न जाता त्यावर मात करणे खरे पुरूषार्थ आहे. खडतर परीस्थितीकडे सकारात्मक नजरेतुन पाहीले, तर हीच परीस्थिती संघर्ष  करण्यास शिकविते, आणि संघर्षातून  जीवन समृध्द करता येते, असे प्रतिपादन शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले.

रोटरी क्लबच्या वतीने शिलाई मशिन व संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगासाठी सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकलचे मोफत वाटप करण्यात आले.

याप्रसंगी रोटरीचे अध्यक्ष रोहीत वाघ, स्टेशन मास्तर भैरवप्रसाद केशरवाणी, सचिव विरेश  अग्रवाल, सनी आव्हाड, अमित दुबे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे विशाल  आढाव, स्वप्नील गवारे, राकेश  काले, अमर नरोडे, प्रकाश  जाधव, कुणाल आभाळे, अभिजीत रक्ताटे,अनुप पटेल, रिंकेश  नरोडे आदी उपस्थित होते. शकिला इम्राण सय्यद, सुरेखा पुंजाराम दवंगे, ज्याती लालु वायकर, सुवर्णा गणेश  वैद्य,रीना सागर मोरे व अलका शिवाजी  दाणे यांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले तर नाटेगांव येथिल अनिल गंगाधर भालेराव व संवत्सर येथिल अनंत चांगदेव निकम या दिव्यांगांना सौर उर्जेवर चालणाऱ्या  तीन चाकी सायकलींचे वाटप करण्यात आले श्री देसले पुढे म्हणाले की संकटातुनही जे सावरतात, ते जीवनात कधीच हार मानत नाही. गरजुंना देण्यात आलेल्या सायकली अथवा शिलाई मशिनद्वारे त्यांनी स्थिर स्थावर होवुन इतरांचे प्रेरणास्थान बनावे, रोहीत वाघ यांनी रोटरीच्या विधायक कामांची माहिती दिली.

सचिव विरेश  अग्रवाल यांनी हरिष  मोटवाणी, डाॅ. ओमप्रकाश  मोतीपावळे, प्रमोद पारख, दिलीप मालपाणी यांचे प्रती शिलाई  मशिनला अर्थसहाय्य दिल्या बध्दल धन्यवाद दिले. सुत्रसंचलन श्री रावसाहेब शेंडगे  यांनी केले तर राकेश  काले यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page