कोकमठाण येथे आ. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
Come to Kokmathan. Various events on the occasion of Kale’s birthday
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 18:50
कोपरगाव : कोकमठाण येथे केएसके कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून आ.आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोकमठाण येथील रामदासी महाराज मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, फळांचे वाटप करण्यात येऊन जागृत देवस्थान लक्ष्मीमाता मंदिरात आमदार आशुतोष काळे यांच्या निरोगी आयुष्यासाठी कोकमठाण ग्रामस्थांच्या वतीने पूजा व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सुधाकर रोहोम म्हणाले, आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा तून कोकमठाण सह मतदारसंघात प्रत्येक गावात विकास पोहोचला आहे रस्ते, पाणी, वीज आदि महत्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे. तसेच जागृत देवस्थान लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून ‘क’ वर्ग दर्जा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. व त्याठिकाणी सभागृह बांधण्या संदर्भात सर्व ग्रामस्थांच्या संमतीने जागा निश्चितीसाठी पाहणी करण्यात आली. यावेळी सुधाकर रोहोम, बाळासाहेब जाधव, सुदाम लोंढे, दिपक रोहोम, विजयराव रक्ताटे, बाळासाहेब राऊत, प्रसाद साबळे,ज्ञानेश्वर रक्ताटे, आबा रक्ताटे, अविनाश निकम, संजय दंडवते, जालिंदर हाडोळे ,संतोष लोंढे, गोरक्षनाथ लोहकणे, महेश लोंढे, पंकज लोंढे संजय थोरात,विजय रक्ताटे, सूनिल लोहकणे, सुनिल लोंढे, राजेंद्र रोहोम, ताराचंद रक्ताटे ,संभाजी गायकवाड , बाळासाहेब पवार, संभाजी देशमुख अजित रक्ताटे, अल्लाउद्दिन सय्यद अंनत रक्ताटे, विशाल जाधव, दिपक कराळे, बंटी सय्यद, जानी धिवर, सुनिल साळुंके,ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थीत होते.