महर्षी स्कूलची कु. प्राजंल शेटे ९८.६०% मिळवून तालुक्यात प्रथम

महर्षी स्कूलची कु. प्राजंल शेटे ९८.६०% मिळवून तालुक्यात प्रथम

Maharshi School’s Ku. Prajanl Shete is first in the taluka with 98.60%

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 19:00

कोपरगाव : सी.बी.एस.ई. बोर्ड दहावीच्या परीक्षेत संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुलची कु. प्राजंल विजय  शेटे   हिने ५०० पैकी ४९३ गुण (९८.६०%)गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. विद्यालयाच्या पंधराव्या बॅचने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

प्राजंल विजय शेटे (९८.६०%) प्रथम,  शताक्षी अण्णासाहेब जाधव (९७.४०%)दुसरी, प्रीती संजय परदेशी (९५.६०%),व अनुज सोपान जुधांरे (९५.६०%),गुण मिळवून तिसरा आला आहे. तर ११७ पैकी सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून २३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण , सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र पानसरे पर्यवेक्षिका सौ. जे.के.दरेकर, सर्व शिक्षक व सर्व पालकांनी अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक जयप्रकाश पांण्डेय, सौ. विद्या ठाकुर,स्वनील पाटील, बाळासाहेब बढे, विजय कोल्हे, मेघराज काकडे, डाॅ.रविंद्र कोहकडे, राहुल काशिद व शिवप्रसाद घोडके आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

You cannot copy content of this page