चांदेकसारे ग्रामपंचायत स्वच्छ पाणी उपलब्ध करून- केशवराव होन

चांदेकसारे ग्रामपंचायत स्वच्छ पाणी उपलब्ध करून- केशवराव होन

Chandeksare Gram Panchayat by providing clean water – Keshavrao Hon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 19:40

 कोपरगाव : तालुक्यात सध्या पावसाने डोळेझाक केली. चांदेकसारे येथील पिण्याच्या पाण्याचा तळ्याजवळ ग्रामपंचायत मार्फत विहीर घेतली होती व गावाला तिच्यापासून पाणीपुरवठा करण्यात येत होता.परंतु पाऊस नसल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली. पाण्याचा सोर्स मिळण्यासाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या वतीने काल या विहिरी मध्ये आडवे बोर मारण्याचे काम सुरू केले.गावाला लवकर चांदेकसारे ग्रामपंचायत स्वच्छ पाणी उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन माजी सरपंच केशवराव होन यांनी केले.

ते विहिरीची पहाणी करताना बोलत होते.  कामिका एकादशी च्या शुभ मुहूर्तावर ग्रामपंचायत चांदेकसारेच्या गावाच्या पाणी पुरवठा विहिरीत आडवे बोर घेण्याच्या कामाची विधिवत पूजा करण्यात आली.यावेळी सरपंच सौ.पूनम  खरात , अशोक होन,दिलीप होन,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी ,आडवे बोर घेणारे कामगार टीम उपस्थित होती. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने गावाचा पाणी प्रश्न सुटत होता. मात्र ऑगस्ट महिना आला तरी पाऊस नसल्याने या विहिरीची पाणीपातळी खालावली. त्यामुळे पाण्याची उपलब्धता करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात आले आहे असे सरपंच पुनम खरात यांनी सांगितले. शेवटी आभार अशोक होन यांनी मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page