पतीच्या निधनानंतर पत्नीला पोस्टाकडून ८२ हजार रुपयांचा धनादेश- नानकर
After the death of her husband, his wife received a check of Rs. 82,000 from the post office – Nankar
कोपरगाव : पतीच्या निधनानंतर काढलेल्या पोस्ट विम्याची ८२ हजार ५०० रुपये रक्कम श्रीमती माया भास्कर तळेकर याना धनादेशाद्वारे नुकतीच देण्यात आल्याची माहिती पोस्ट मास्तर राजेंद्र नानकर यांनी दिली.
नानकर म्हणाले श्रीमती माया भास्कर यांचे पती भास्कर तळेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले कै भास्कर तळेकर यांनी आठ वर्षापूर्वी रवंदे येथे ५०००० रुपयांचा पोस्ट ऑफिस चा ग्रामीण विमा काढला होता . काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले सर्व कागदपत्र पुर्तता केल्या नंतर श्रीरामपुर प्रधान कार्यलयाने त्यांचा विमा क्लेम मंजुर केला . क्लेम मंजुर करण्यासाठी रविंद्र निंबाळकर वैभव कवडे पोस्टमस्तर सागर आढाव श्रीमती विमल मोहन शहाणे यानी सहकार्य केले विभागीय निरीक्षक विनायक शिंदे यांच्या हस्ते श्रीमती माया तळेकर यांना ८२ हजार ५०० रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला यावेळी डाकपाल राजेंद्र नानकर प्रमोद कवडे सोमनाथ टांगतोडे संजय ढेपले अर्जून मोरे व कर्मचारी उपस्थित होते यावेळी विभागीय डाक निरीक्षक शिंदे यांनी उपस्थितांना विम्याचे महत्त्व पटवून दिले.