दहा लाखाच्या सूरेगाव सामाजिक सभागृहाचे स्नेहलता कोल्हेंच्या  हस्ते लोकार्पण

दहा लाखाच्या सूरेगाव सामाजिक सभागृहाचे स्नेहलता कोल्हेंच्या  हस्ते लोकार्पण

Dedication of 10 lakh Suregaon Social Hall by Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: Thu 5 August 19:50

कोपरगाव :  तालुक्यातील सुरेगाव येथे गावांतर्गत मूलभूत सुविधा २५९५ योजनेअंतर्गत  दहा लाख रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.

कोरोना महामारीच्या संकटग्रस्तांना मानसिक आधार देऊन त्यांची  सुख दुःखे समजून घेऊन ती हलकी व्हावी या उद्देशाने सौ. कोल्हे यांनी व्यक्तीगत संपर्क केला.  कोरोना योद्ध्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी शंकरराव कदम होते.           

   प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  सचिन वाबळे व गोरख कदम यांनी सुरेगावात तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हेच्यI सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची विकासकामे पूर्ण झाल्याचे  प्रास्ताविकात सांगितले.   संजीवनी युवा प्रतिष्ठान व कोल्हे  कुटुंबीयांनी कोवीड काळात केलेले काम गौरवास्पद असल्याचे डॉ.  सय्यद यांनी सांगितले.  महादेव मंदिरासमोरील सभागृहाचे स्नेहलता कोल्हे यांनी भूमिपूजन केले.याप्रसंगी पांडुरंग वाबळे,  भागवत कदम, गोवर्धन महाराज, प्रशांत वाबळे, संचालक मनेष  गाडे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड, संजय वाबळे यशवंत निकम, ग्रामपंचायत सदस्य रश्मी शांताराम कदम, तुकाराम निकम,  राजेंद्र भंडारी, अंबादास सोनवणे, सोपानराव सोनवणे, उत्तमराव निकम, विश्वास गाडे,  डॉ. दत्तात्रय कोळपे डॉ. व्ही. एल.  तरोळे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम  बोरावके, एकनाथ माळी, भानुदास भवर, छबुराव माळी, वेळापूरच्या सरपंच वैशाली भोसले, आदी उपस्थित होते.        

   सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की,  कोपरगाव मतदारसंघातील रहिवासियांना  माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी प्रत्येक संकटात  कायम मदतीचा हात दिलेला आहे.  शेवटी सचिन वाबळे यांनी उपस्स्थितांचे आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page