कोपरगाव पोस्टात उत्तर काशीचे (गंगोत्री)चे पवित्र गंगाजल विक्रीस उपलब्ध

कोपरगाव पोस्टात उत्तर काशीचे (गंगोत्री)चे पवित्र गंगाजल विक्रीस उपलब्ध

Holy Ganga water of North Kashi (Gangotri) available for sale at Kopargaon Post

 कोपरगाव : दक्षिण गंगा गोदावरी तीरावर  संत महंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत  अध्यात्मिक महत्व असलेला श्रावणमासा निमित्ताने शिव उपासक आणि हिंदू विधीत काशी तीर्थ स्नानाला विशेष महत्त्व आहे. व लोकांना असलेली गरज लक्षात घेता भारतीय डाक विभाग कोपरगाव च्या पोस्ट २५० मिली गंगाजल बंद बाटली द्वारे कार्यालयात ३० रुपये प्रति नग प्रमाणे गंगाजलाचा बाटल्या विक्रीस उपलब्ध असल्याची माहिती पोस्टमास्तर राजेंद्र नानकर यांनी दिली.

श्रावणामास निमित्त कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य मंदिर त्रंबकेश्वर कचेश्वर महाराज कांचनवाडी कोकमठाण येथील विभांडक ऋषी आश्रमात संवत्सर येथील शृंगऋषी मंदिरात शहरातील जुन्या गावठाण भागातील महादेव शिवलिंगाचे मंदिर येथे अभिषेक विविध धार्मिक विधीसाठी गंगेचे तीर्थाला विशेष महत्त्व आहे.भाविकांची गरज ओळखून भारतीय टपाल खात्याने हे तीर्थ टपाल विभागातील कार्यालयात उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. गंगाजल तिर्थाचे विक्री वितरणास कोपरगावात सुरुवात करण्यात आली. श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे जनरल मुखत्यार .महेंद्र पाटील,  दत्तपार देवस्थान व श्री स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त विधिज्ञ जयंत जोशी,  आदी सह डाक कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page