चौकात ठोकून काढू ही सुसंस्कृत नेत्याच्या वारसाची भाषा नाही- विवेक कोल्हे
Stumbling in the crossroads is not the language of the heritage of a cultured leader – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 20:40
कोेेपरगांव: कोपरगाव विकासाच्या अनेक मुददयावर आपण आवाहन करूनही आमदार आशुतोष काळे चर्चेला यायला तयार नाही, मात्र भर चौकात येऊन ठोकुन काढू ही भाषा करतात, ती एका सुसंस्कृत नेत्याच्या वारसाची भाषा नाही व कोपरगांवकरांची संस्कृती नाही, कशी घणाघाती टीका जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांच्या पदग्रहण समारंभ प्रसंगी शुक्रवारी नगरपालिकेत केली.आमची जिरवण्यांच्या नादात कोपरगांवची जिरवू नका म्हणजे झालं असा टोलाही त्यांनी लगावला.
विवेक कोल्हे म्हणाले, शहर विकासात जर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नगरपालिका, वाचनालय, पोलिस ठाणे, अग्नीशमन, बसस्थानक इमारती, निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन, ४२ कोटीसह वाढीव ७ कोटीची पिण्यांच्या पाण्यांची योजना, पाचव्या साठवण तळयाची मंजुरी, बंदिस्त नाटयगृहासाठी २ कोटी आदि मंजु-या देवुनही कोल्हेंनी कोपरगांवच्या विकासाची वाट अडविली या आमदार व त्यांच्या समर्थकांच्या आरोपात तथ्य नाही, विवेक कोल्हे म्हणाले, शहर विकासात आम्ही कधीही मतभेदाची दरी निर्माण केलेली नाही तर उलट आमदार आशुतोष काळे यांना निळवंडे शिर्डी कोपरगांव, पाचवे साठवण तळे, कोरोना महामारी आदि विविध मुद्यावर एकत्र येवुन बैठक घेवुन चर्चेतुन प्रश्न सोडविण्यांचे आवाहन केले होते परंतु श्रेयाच्या भीतीने त्यांनी प्रतिसाद दिला नाही, पण आमची तशी इच्छा नाही. आज कोपरगांवच्या इतिहासात मुस्लीम समाजास उपनगराध्यक्षपदी पाहुन सर्वाथाने लौकीक वाटतो. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व बिपीनदादा कोल्हे यांनी हाजी करीमभाई कुरेशी यांच्यासह सर्व मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक सुख दुःखात समर्थपणे सहभाग देवुन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजवर प्रयत्न केलेले आहे. युवापिढींने भडकावूपणांला साथ न करता आपले हीत कशात आहे हे पाहुन काम करावे. मुंबई समृध्दी मार्गाच्या कामात कोपरगांव येथे प्रस्तावीत स्मार्ट सिटी होवु घातलेली असतांना येथील लोकप्रतिनिधींनी ती न्यायालयात जाउन रद्द केली अन २५ हजार युवकांच्या नोक-या घालविण्यांचे पाप काळेंनी आपल्या माथी मारून घेतले., या स्मार्टसिटीतुन छोटया मोठया व्यावसायिकांसह व्यापा-यांचे पोट भरले असते अअशी खंत विवेक कोल्हे शेवटी व्यक्त केली. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले. उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विनोद राक्षे, अकबरभाई शेख, फकिर महंमद पहिलवान यांची भाषणे झाली. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, नारायण अग्रवाल, मनसेचे सतिश काकडे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, रिपाईचे जितेंद्र रणशुर, वैभव गिरमे, किरण सुपेकर, गोपीनाथ गायकवाड, पिंकी चोपडा, सुशांत खैरे, संचालक प्रदिप नवले, हाजी मेहमुद सय्यद, रियाज सर, निसार सयद, मौलाना हमीदभाई, हाजी नजिर, गुलाब नबी शेख, हाजी सद्दाम, ॲड. दारूवाला आदि उपस्थित होते.