गोदावरी नदीत साडेपाच हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरु

गोदावरी नदीत साडेपाच हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरु

Discharge started in Godavari river at five and a half thousand cusecs

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Fir 6 August 20:20

कोपरगाव :दारणा धरणातून १ हजार ८९६ क्यूसेक्स नांदूर-मधमेश्वर धरणातून ३ हजार २२८ भावली धरणातून १३५ वालदेवी धरणातून २४१ क्यूसेक्स असे साडेपाच हजार क्युसेक्स वेगाने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडले  जात आहे.

नाशिक जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रात बर्‍यापैकी पाऊस होत आहे त्यामुळे गंगापूर धरणात ७० टक्के नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात ९६ टक्के पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे खात्याच्या वतीने देण्यात आली आहे .वालदेवी व भावली ही धरणे शंभर टक्के तर गिरणा धरण ३९टक्के भरले आहे गिरणा धरण समूहात ५३ टक्के जलसाठा आज मितीस झाला आहे. मात्र कोपरगाव तालुक्याच्या परिक्षेत्रात अद्यापही म्हणावा असा पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पेरणी झालेली पिके माना टाकत आहे तर काहींकडे जेवढे पाणी आहे तेवढे उपसा करून दिले जात आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढणार असून पावसाने जोर धरल्यास गोदावरी नदीला पूर येऊ शकतो असा अंदाज वर्तवला  आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरून वाहू लागतील असेही हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज किती खरा ठरतो हे येणारा कालावधीच सांगेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page