ॲड .रवींद्र बोरावके यांची ग्रीड इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती
Adv. Ravindra Borawke appointed as Director, Grid India
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 5 May 18.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: ॲड .रवींद्र बोरावके यांची देश पातळीवरील ग्रीड इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय पातळीवर भारत सरकारच्या दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल कंपनीचे अनेक वर्षांपासून संचालक आहेत. कोपरगाव येथील ज्योती नगरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष अशी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली, प्रारंभिक काळात एक सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी तळागाळात काम करून कोपरगाव मध्ये भारतीय जनता पक्ष वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. काही काळ पक्षाचे जिल्हा नेतृत्व सुद्धा त्यांनी केले
ग्रीड इंडियाच्या संचालकपदी बढती मिळण्यापूर्वी, ते बीएसएनएलचे संचालक म्हणून काम करताना त्यांनी त्यांचे स्थान मजबूत केले आहे.
देशाचे महामहीम राष्ट्रपतींच्या शिफारशी नुसार करण्यात आली आहे. संपूर्ण देशातील राज्यांना विजपुरवठा नियंत्रण करणाऱ्या ग्रिड इंडिया या कंपनीच्या संचालकपदी ॲड बोरावके यांची निवड झाल्याने कोपरगाव मतदार संघाच्या शिरपेचात एक नवा तुरा खोचला आहे त्यांच्या निवडीचे मतदार संघाचे जिल्ह्यातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे
Post Views:
198





