टपाल पॅकर सुधाकर गोरडे ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
Postal packer Sudhakar Gorde retires after 42 years of service
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sun 8 August 14:50
कोपरगाव : शहर पोस्ट कार्यालयातील टपाल पॅकर सुधाकर गोरडे ४२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांचा व विभागाचे निरीक्षक विनायक शिंदे शिर्डीचे पोस्ट मास्तर राजेश नेतनकर कैलास हाडोळे आदी कर्मचाऱ्यांनी गोरडे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ड्रेस छत्री व त्यांच्या पत्नीला साडीचोळी देऊन यथोचित सत्कार केला.अध्यक्षस्थानी पोस्टमास्तर राजेंद्र नानकर होते.
यावेळी दीपक आवारी संजय ढेपले प्रमोद कवडे गणेश माने शैलेश शीलवंत बापू चव्हाण नितीन वाघमारे श्रावण बनसोडे अनिल ठाकरे आधी कर्मचारी उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना बोरुडे म्हणाले साई साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत व गुरु शुक्राचार्य यांच्या आशीर्वादाने मला बेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक छोटी मोठी माणसे भेटली त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले सुरुवातीला तिकीटविक्री चे काम केले नंतर टपाल वाहतूक सेवा विभागात रुजू झालो हीच शिदोरी घेऊन सर्व पोस्ट कर्मचाऱ्यांनी जीवाला जीव देऊन सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून वाटचाल केली त्यामुळे मी यशस्वी होऊ शकलो असे भावनाविवश होत त्यांचा कंठ दाटून आला सूत्रसंचालन अर्जुन मोरे यांनी केले आभार ज्ञानदेव पगारे यांनी मानले विभागाचे निरीक्षक विनायक शिंदे यांनी गोरडे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे वक्तशीर सचोटीने काम काज केल्याबद्दल कौतुक करून उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या .
चौकट टपाल पॅकर सुधाकर गोरडे सेवानिवृत्त होत असल्याचे कळाल्यावर मुंबईचे असिस्टंट जनरल पोस्ट मास्तर एफ बी शेख यांनी त्यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिष्टचिंतन करीत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.