आजारपणातही त्यांनी जागविला विवेक- हभप. चौधरी
He awakened Vivek even in his illness.- Kirtankar Chaudhary
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Sun 8 August 19:10
कोपरगाव : कोरोना शब्द उच्चारला तरी इकडे पाय लटलट कापायला लागतात,त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली की, घरचे सख्खे, सगेसोयरे लांब दूर पळून जातात. गल्लीतले, आसपासचे ना बोलते होतात, त्याला एखाद्या रोग्याप्रमाणे वाळीत टाकले जाते, अशा कोरोनाच्या महाभयंकर दुसऱ्या लाटेत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून मायेचा आधार देत आजारपणातही नावाप्रमाणे विवेक जागविल्याची प्रतिक्रिया ह.भ प.विजय महाराज चौधरी यांनी व्यक्त केली.
ह.भ. प. चौधरी म्हणाले सत्कर्म करा आम्ही नेहमीच भजन-कीर्तनातून इतरांना सांगत असतो त्याची प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष कृती काहीजण करतात. आमचे बंधू नारायण चौधरी कोरोनाने आजारी पडले होते. तेंव्हा त्यांना विवेक कोल्हे यांनी आत्मा मलिक संकुलात स्वतंत्र कोवीड सेंटर सुरु केलेल्या सेंटरमध्ये दाखल केले होते, तिथे आमच्यासह हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. त्यांच्या दोन वेळच्या नाष्टासह जेवणाची स्वादिष्ट सोय केली. याशिवाय पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणी उपचार घेण्यासाठी वैद्यकीय रुग्णालयांची माहिती, दिमतीला रुग्णवाहिका, स्थानिक कोपरगाव शहरातील वैद्यकीय रुग्णालयात नातेवाईकांसाठी माहिती दालने, प्राणवायूचा पूरेसा साठा, रीमिडीसिवर इंजेक्शन, आयुर्वेदिक औषधी काढे आणि उकडलेली अंडी, रक्त लघवी चाचणीची स्वतंत्र व्यवस्था करून उपचारासाठी असं सारं काही पुरवलं. रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत सुखरूप घरी आणून सोडलं हे कोल्हे कुटुंबीयांच दातृत्व.काही वेगळेच आहे. कोल्हे यांचे कोवीड सेंटर नसते तर गोरगरीब कोरोनाग्रस्तांची फरफट होऊन ते तुमच्या आमच्यात आज दिसले नसते. कोल्हे कुटुंबियांचे जीवनदानाचे सत्कर्म चौधरी प्रमाणेच संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघ कुटुंबीयांच्या लक्षात राहील असेही ते म्हणाले. .