विकासाचे अनुत्तरीत प्रश्न मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्य – आ. आशुतोष काळे
My first duty is to sort out the unanswered questions of development. MLA Ashutosh Kale
Rajendra Sankar l वृत्तवेध ऑनलाईन l Sun 8 August 14 :20
कोपरगांव: खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी रचलेला विकासाचा पाया माजी आमदार अशोक काळे यांनी पुढे नेऊन,अनेक प्रश्न सोडविले मला मिळालेल्या संधीतून तो वारसा पुढे चालवण्याची जबाबदारी सर्वस्व पणाला लावून पूर्ण करताना विकासाचे अनुत्तरीत प्रश्न मार्गी लावणे हे माझे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील विविध गावातील विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे ४८ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बाळासाहेब देवकर घर ते अनिल चव्हाण घर रस्ता, पद्माकांत कुदळे घर ते बापूसाहेब बोरावके घर रस्ता, प्रभाकर बोरावके विहीर ते राजेंद्र अंबर घर रस्ता व दत्तमंदिर ते छबुराव आव्हाड घर रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे व दत्तमंदिर परिसर येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमीपूजन तसेच संवत्सर येथे येथे २४ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या बबनराव बारहाते वस्ती ते कोद्रे वस्ती रस्ता व पोपट गायके वस्ती ते अरुण जगताप वस्ती रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमीपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागील पाच वर्षात अनेक गावांना सापत्नपणाची वागणूक दिली गेली. मी मात्र संपूर्ण मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वच गावातील नागरिकांपर्यंत विकास कसा पोहोचेल यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या शेजारील जरी गाव असले तरी त्या गावातील नागरिकांना अपेक्षित असलेली विकासकामे करणार आहे. मतदार संघातील अनेक गावांचा रस्ते, पाणी, विजेचे प्रश्न देखील प्रलंबित आहेत याची मला जाणीव असून जनतेने निर्धास्त राहावे. कोरोनाच्या संकटात देखील आपण निधी मिळविला आहे त्यामुळे पुढील काळात मतदार संघाच्या विकासासाठी अजून निधी आणून निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू असे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवन, छबुराव आव्हाड, के एस के कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक पद्माकांत कुदळे, विठ्ठलराव आसने, बाळासाहेब बारहाते, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले, दिनार कुदळे, छगणराव देवकर, दिलीपराव गायकवाड, लक्ष्मण देवकर, कुमावत, उपअभियंता प्रशांत वाकचौरे, पंचायत समिती शाखा अभियंता लाटे, दहिफळे, ग्रामसेवक विजय पाटील आदींसह टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट – आमदार आशुतोष काळे यांच्या रूपाने जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अठरा तास राबणारा लोकप्रतिनिधी लाभला असून प्रतिकूल परिस्थितीत देखील कोपरगावची वाटचाल समृद्ध विकासाकडे सुरु आहे. त्यामुळे कोणी कितीही कोल्हेकुई केली तरी आ. काळे एकटे विरोधकांना पुरून उरतील – कारभारी आगवण.





