ते’ स्थगिती आदेश उठवा; वहाडणे यांचा प्रसिद्धी माध्यमाद्वारे विनंती अर्ज
Raise the suspension order; Vahadne’s request form through the media
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue14sep 2021, 19:00Pm.
कोपरगाव : शहरातील रस्त्यांचा बट्ट्याबोळ झाला असून आता आडवा आडवी, जिरवा जिरवी, आरोप-प्रत्यारोप यामुळे राज्यभर पालिकेची व शहराची बदनामी झाली यामुळे जनतेचाही नगरसेवक, नेते आणि कार्यकर्तेवरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही, बस्स् झाले आता याची किळस व कंटाळा यायला लागला लोकांचे हाल बघवेना, उच्च न्यायालयातून ते’ स्थगिती आदेश उठवा अशी आर्त हाक देत विनंती अर्ज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भाजप-सेना नगरसेवकांसाठी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दाखल केला आहे.
विजय वहाडणे म्हणाले, भाजपसेना नगरसेवकांनी उच्च न्यायालयातून २८ कामांना स्थगिती घेतली यावर गेल्या दोन चार महिन्यात एकमेकांकडे बोट दाखवून केवळ आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या बराच काथ्याकूट झाला परंतु प्रत्यक्षात जनतेचे काहीच भले होणार नाही हे बघून आपण हे पाऊल उचलले असून माझी भूमिका आज मी तुमच्यापुढे मांडली आहे. अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गेल्या दीड महिन्यापासून कुठल्याही माध्यमाद्वारे मी कोणावरही टीका केलेली नाही, यापुढेही मी या गोष्टी पाळणार आहे. काळे गटाच्या नगरसेवकांनी मला काही कामासाठी पाठींबा दिला याचा अर्थ मी काळे गटाचा झालो असा होत नाही, मी स्वतंत्र होतो व स्वतंत्रच आहे. हा अर्ज करून मी कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक टप्पा पुढे गेलो आहे, असे वहाडणे म्हणाले. हेवेदावे सर्व विसरा, शहराला न्याय द्या, सर्व पक्षाचे गटनेते व दोन त्रयस्त माणसे घेऊन समिती नेमू, दर्जेदार कामे करून घेऊ, इस्टिमेट काही असले तरी ठेकेदाराला योग्य पेमेंट देऊ, मला श्रेय मान्य नाही, लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, कामे करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही, आता लोकांच्या भल्यासाठी “झाले गेले गंगेला मिळाले”, मी कुणाला दोष देणार नाही. सर्व विसरून मोठे मन दाखवा, दर्जेदार कमी कामे करून घेऊ, लोकांना दिलासा देऊ, तेंव्हा अर्ज द्या, स्थगिती उठवा, असे आवाहन वहाडणे यांनी परिषदे मधून शेवटी भाजपसेना नगरसेवकांना केले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोकांचे होणारे हाल पाहून एखादेवेळेस वहाडणे यांचे खरोखरच मतपरिवर्तन झाले ही असेल पण अचानक घुमजाव करत वहाडणे यांनी स्वभावाविरुद्ध घेतलेल्या मवाळ भूमिकेचे मात्र पत्रकारातून आश्चर्य व्यक्त होत होते.