जनतेचा खोटा कळवळा, हि तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका -साठे

जनतेचा खोटा कळवळा, हि तर कोल्हेंची दुतोंडी भूमिका -साठे

False compassion of the people, this is the double role of Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue14sep 2021, 19:20Pm.

  कोपरगाव : रस्त्यांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर आपल्या नगरसेवकांना न्यायालयात पाठवायचे. काही संघटनांनी या खड्ड्यात मुरूम टाकला तर चिखल झाला म्हणून ओरडायचे हि कोल्हे गटाची दुतोंडी भूमिका असल्याची टीका सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष रावसाहेब साठे यांनी केली आहे.

     कोपरगाव शहरातील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दोन दिवसापूर्वी काही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मुरूम टाकून खड्ड्यांमुळे होत असलेल्या नागरिकांच्या यातना कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे या मुरुमाचा काही ठिकाणी चिखल झाला. यावरून कुठले गटांनी कांगावा सुरू केला आहे. पण खराब रस्त्यांमुळे नागरिकांना किती त्रास होतो हे मी स्वत: अनुभवत आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांनी तात्पुरती डागडुजी केली तर बिघडले काय ? मात्र आपल्या बगलबच्च्यांना पुढे करून उलट-सुलट स्टेटमेंट देवून नागरिकांची दिशाभूल करायची हे जनतेने ओळखले आहे.            

मागील एक वर्षापासून खराब रस्त्यांचा त्रास नागरिक सहन करीत असतांना तुम्हाला नागरीकांच्या आरोग्याची काळजी वाटली नाही का? तुम्हाला जर जनतेच्या आरोग्याची खरंच काळजी असती तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी २८ विकासकामांना दिलेल्या मंजुरीला न्यायालयात आवाहन दिलेच नसते. जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बंद करा व नागरिकांच्या भावनांशी खेळू नका असे साठे यांनी सांगितले आहे.         

Leave a Reply

You cannot copy content of this page