निळवंडे कालव्यांची कामे तात्काळ चालू करा-स्नेहलता कोल्हे 

निळवंडे कालव्यांची कामे तात्काळ चालू करा-स्नेहलता कोल्हे

Start work on Nilwande canals immediately – Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 28 Oct 2021,16:28Pm.

 कोपरगाव : जिरायत भागासाठी निळवंडे धरण वरदान असुन त्याच्या कालव्याच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सातत्याने निधीची उपलब्धता करून देण्यात येते तेव्हा ही कामे तात्काळ चालू करणेबाबत संबंधीतांना सुचना व्हाव्यात या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले.

    श्री. नितीन गडकरी हे गुरुवारी अहमदनगर जिल्हा दौ-यावर आले असता त्याचे काकडी शिर्डी विमानतळावर सौ. स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले व त्यांना निळवडे धरण कालव्याच्या कामाच्या मागण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी संजय उद्योगसमूहाचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासह काकडी पंचक्रोशीतील सर्व गावांतील शेतकरी शिष्टमंडळ उपस्थित होते.            सौ. कोल्हे यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, निळवडे कालव्याच्या कामासाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तसेच आपल्या पाच वर्षाच्या कामकाजात सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील जवळके, रांजणगांव देशमुख, बहादरपुर, अंजनापुर, वेस_ सोयेगाव बहादराबाद, धोंडेवाडी, शहापुर, काकडी_ मल्हारवाडी, मनेगाव व पोहेगाव या ११ गावातील शेतक-यांची ९३ हजार ९९६ एकर जमीनीचे क्षेत्र ओलिताखाली येवून त्यात मोठा फायदा होणार आहे. येथील शेतकरी सातत्याने त्याकडे आस लावून बसलेला आहे. निळवंडे धरण कालव्याची या भागातील कामे जलदगतीने २०२२ पर्यंत कशी पूर्ण होतील यावर जलसंपदा विभागाने भर द्यावा आणि ही कामे चालू करणेबाबत संबंधीतांना आदेश व्हावेत असेही सौ. कोल्हे यांनी म्हटले असुन देशातील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पावले टाकत सर्वप्रथम पॅरासिटामॉल औषधी प्रकल्प सुरू केला आहे तेव्हा त्याला केंद्र स्तरावर अनुदान मिळावे अशी मागणीही सौ. कोल्हे यांनी केली आहे. त्यावर मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधीत या प्रश्नात लक्ष घालुन ते पूर्ण करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page