शरद पवारांना डी. लिट पदवी, संजीवनी उद्योग समुहाकडून सत्कार
Sharad Pawar to D. Lit Degree, felicitated by Sanjeevani Udyog Samuha
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 28 Oct 2021,17:28Pm.
कोपरगांव : माजी केंद्रीय मंत्री व सर्वोत्कृष्ट संसदपटू, महाराष्ट्रiचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डी. लिट पदवी प्रदान केल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सन्मान करत त्यांच्या उत्तम आयूरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. याप्रसंगी काकडी पंचकोशीतील ग्रामस्थ व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.
श्री. शंकरराव कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री, तत्कालीन केंद्रीय कृषि मंत्री म्हणून शरद पवार यांनी जे काम केले ते कौतुकास्पद आहे. त्यात महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांच्या जीवनांत आर्थीक समृध्दी निर्माण करण्यांत वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पाडेगांव व अंबोली उस संशोधन केंद्रातुन नव नविन अधिक उत्पन्न देणा-या उस जाती विकसीत करून त्याचा मोठया प्रमाणांत प्रसार केला. ग्रामिण अर्थकारणाचा दर्जा सुधारून त्यात अधिक शाश्वतपणा निर्माण करण्यांत शरदचंद्रजी पवार यांचे योगदान मोठे आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने त्यांचा सन्मान करून महाराष्ट्र राज्याचा लौकीक वाढविला आहे असे सांगुन त्यांच्या भावी कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. माजीमंत्री शरद पवारांनी श्री. शंकरराव कोल्हे यांच्या तब्येतीची विचारपुस करत त्यांच्या वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, राष्ट्रीय सहकारी साखर संघ नविदिल्ली, रयत शिक्षण संस्था आदि कार्याच्या आठवणींना उजाळा देत उत्तम आयूरारोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.