पाच नंबर तलावाला आडून पाडून न्यायालयातून आडकाठी आणू नका -आ. आशुतोष काळे

पाच नंबर तलावाला आडून पाडून न्यायालयातून आडकाठी आणू नका -आ. आशुतोष काळे

Do not block the lake number five and bring it to the court. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 28 Oct 2021,10:28Pm.

कोपरगाव : शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्‍नासाठी शरद पवार यांच्या माध्यमातून  पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांसाठीच्या १२०  कोटी १२ लाख खर्चाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाकडून तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. तेव्हा आता कृपा करून पाच नंबर साठवण तलावाला आडून पाडून न्यायालयातून आडकाठी आणू नका, अशी अपेक्षा आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी गौतम बँक सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केली.

 आ.आशुतोष काळे म्हणाले की, पाच नंबर साठवण तलावाचे खोदकाम शरद पवार यांच्या मैत्रीतून गायत्री  कंपनीमार्फत करून खुदाई व वाहतूक असे सात ते आठ कोटी रुपये पालिकेचे वाचविले आहेत. २०५२ पर्यंतची पुढील तीस वर्षाची लोकसंख्या व हद्दवाढ विचारात घेऊन दुरुस्ती वीजबिल यास नगरपालिकेला परवडेल अशा स्वरूपाची ४०० एम.एल.डी. क्षमतेच्या योजना करण्यात आली आहे. यात साठवण तलाव १,२,३ व ४ ची दुरुस्ती  १९६ किलोमीटर वितरण व्यवस्थेपैकी   १०५ किलोमीटरच वितरण व्यवस्था उपलब्ध असल्यामुळे उर्वरित ९१ किलोमीटर वितरण व्यवस्थेच्या कामाचा यामध्ये समावेश आहे. तसेच कोपरगाव बेट, ब्रिजलाल नगर, गोरोबानगर व संजयनगर याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून लक्ष्मीनगर येथील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.या कामासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सर्व प्रशासकीय  अधिकारी यांचे सहकार्य लाभले आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.    

यासाठी प्रशासकीय मान्यता मिळविणे,  निविदा काढणे, वर्क ऑर्डर देणे, तसेच नव्याने हद्दवाढीने समाविष्ट झालेल्या भागात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधासह शहरात भुयारी गटारी, बगीचे, बंदिस्त नाट्यगृह,  जलतरण तलाव, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी खेळाचे मैदान, पूल व पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी  उपाययोजना, आठवडे बाजार जागा सुधारणा,  हॉकर्स झोन व पार्किंगची व्यवस्था, म्हाडा अंतर्गत बेघर नागरिकांना स्वत:च्या हक्काची घरे देणे, सरकारी जागेवरील नागरिकांना स्वतःचा सातबारा उतारा मिळवून देणे या सर्व यासाठी पाठपुरावा करणार आहे. नव्याने बांधण्यात येत असलेल्या कोपरगाव बस आगाराच्या दक्षिणपूर्व जागेमध्ये  संगमनेर आगाराप्रमाणे  व्यापारी संकुल गाळे का बांधण्यात आले नाही हा संशोधनाचा विषय आहे. आता जरी गाळे बांधणे  शक्य नसले तरी डेपोच्या जागेत बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधता येईल का ? याचा पाठपुरावा सुरू आहे.    यावेळी धरमचंद बागरेचा,सुनील गंगूले,  कलविंदरसिंग दडीयाल,  विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे,  मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, दिनार कुदळे, दिनकर खरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, चंद्रशेखर म्हस्के, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे,असलम शेख, सचिन परदेशी, जावेद शेख, राहुल देवळालीकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.                          

Leave a Reply

You cannot copy content of this page