पाच वर्षात कालव्यांची ५०० कोटीचे कामे करून घेणार – आ. आशुतोष काळे

पाच वर्षात कालव्यांची ५०० कोटीचे कामे करून घेणार – आ. आशुतोष काळे

500 crore canal works to be completed in five years – Mla. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun21 Nov.2021 17.50Pm.

कोपरगाव : निवडणूक निकालाची परंपरा यापुढेही कायम ठेवा, विकासाचा वारू थांबू देणार नाही, पाच वर्षात कालव्यांची ५०० कोटीचे कामे करून घेणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथे ग्रामस्थांच्यावतीने साई संस्थान अध्यक्ष झाल्याच्या सत्कार समारंभात व्यक्त केला. यावेळी त्यांनी ४ कोटी ३८ लाखांचा विविध कामांची सुरुवात केली.अध्यक्षस्थानी सभापती सौ. पोर्णिमा जगधने होत्या.

यावेळी उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कर्मवीर काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, अशोकमामा काळे, बबनराव कोळपे,प.स. सदस्य अनिल कदम, श्रावण आसने,राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, संभाजीराव काळे उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे म्हणाले की, सर्व मंत्र्यांचे सहकार्यातून मला चालू वर्षी ५५ कोटी रुपये निधी दुरुस्तीसाठी उपलब्ध झाला असून पुढील वर्षी मिळणाऱ्या १०० कोटीच्या निधीतून गोदावरी कालव्यांची मोठ्या प्रमाणात कामे होणार आहे. येत्या ५ वर्षात गोदावरी कालव्यांची ५०० कोटीची कामे करून घेणार असल्याचे सांगितले. राहिलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी राधु कोळपे, सिकंदर पटेल, कचरु कोळपे, गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र ढोमसे, शशिकांत वाबळे, सौ.मीनल गवळी, प्रविण निंबाळकर, प्रशांत घुले, नानासाहेब चौधरी, डॉ. प्रकाश कोळपे, मच्छिंद्र हाळनोर, विकास रणसिंग, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे, अभियंता उत्तमराव पवार, गाडे, दिघे आदीसह सुरेगाव कोळपेवाडी, शहाजापुर,  मढी बु. कोळगाव थडी, माहेगाव देशमुख, कुंभारी, धारणगाव व पंचक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page