४२ कोटी च्या पाणी योजनेचे पाईप चोरी झाली संबंधितावर गुन्हे दाखल करा – संजय काळे

४३ कोटी च्या पाणी योजनेचे पाईप चोरी झाली संबंधितावर गुन्हे दाखल करा – संजय काळे

File a case against the theft of pipes worth Rs 43 crore – Sanjay Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 18.30Pm.

 कोपरगाव: यु. आय. डी. एस. एस. एम. टी. अंतर्गत कोपरगाव शहरात झालेल्या पाणीपुरवठा योजनेतील असंख्य पाईप चोरी झाल्याची बाब कागदपत्रातून निदर्शनास येते, त्यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, ठेकेदार, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर व कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सदर पत्रात काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव नगरपालिकेने अंतर्गत यु. आय. डी. एस. एस. एम. टी. अंतर्गत कोपरगाव शहरातील पाणी योजनेची सुधारणा करण्यासाठी एकूण ४३ कोटी ६७ लाख रुपयांची योजना आखली. सदरचे काम मे. विजय कन्स्ट्रक्शन परळी वैजनाथ, जिल्हा बीड यांना देण्यात आले या योजनेअंतर्गत नगरपरिषदेने खरेदी केलेल्या विविध व्यासाच्या पाइपची लांबी मला माहिती देण्यात आली ५फेब्रुवारी २०१५ च्या माहिती अधिकारात मला पाईप कसे अंथरले जाणार याची माहिती देण्याचे मात्र टाळले. मात्र ३० ऑक्टोबर २०१८ रोजी रोजी तात्कालीन जन माहिती अधिकारी, पाणीपुरवठा विभाग कोपरगाव नगर परिषद यांनी मला योजनेच्या चालू प्रगतीचा अहवाल दिला. त्यामध्ये पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले होते. दिनांक २५ जुलै २०१९ रोजी माहितीच्या अधिकारात मी कोपरगाव नगर परिषदेला माहिती योजनेतील खाली माहिती मागितली, (१)पाणी योजनेतील खरेदी केलेल्या पाईप संख्या व मीटर संख्या, (२) शहरात कोणत्या भागात किती? व्यासाची किती ? पाइप टाकण्यात आले ? याची माहिती, (३) किती व्यासाचे किती पाइप व वॉल याची माहिती मागितली. परंतु नगरपालिकेने ठेकेदार विजय कन्स्ट्रक्शन यांना पत्र पाठविले व वरील तीन मुद्द्याची माहिती देण्यास सांगितले. याचा अर्थ असा होतो की, ठेकेदाराने कोणती पाईप कुठे अंथरले व किती उरलेत याचा तपशील कोपरगाव नगरपरिषदेत उपलब्ध नाही. तसेच किती वॉटर मीटर खरेदी केले ? त्याचाही तपशील नगरपालिकेचे उपलब्ध नाही. असा होतो. सदर माहिती नगरपालिकेने न दिल्यामुळे मी ३० सप्टेंबर २०२० रोजी अपील दाखल केले, व सदर या अपिल अन्वये वरील माहिती त्वरित देण्याचा आदेश झाला. असं असतानाही नगरपालिकेने आजपर्यंत मला ही माहिती दिलेली नाही, मात्र याबाबत सदरचे रेकॉर्ड नगरपरिषदेत उपलब्ध नसल्याची चर्चा नगरपालिकेत चालू आहे. योजना शंभर टक्के पूर्ण झाली सन २०१८ मध्ये कागदोपत्री पण आज अखेर नवीन पाईपलाईन मधून कुठेही पाणी पुरवठा झालेला नाही, असा आरोपही संजय काळे यांनी केला आहे. गेल्या सहा वर्षांत नगरपालिकेने पाईप अंथरलेचा हिशोब मला दिलेला नाही याचा अर्थ नगरपालिका व ठेकेदार यांनी शहरात पाईप न अंथरता पाईपलाईनचे बिल काढले असल्याचा संशय बळावत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. पाईपलाईनचे खोदकाम व अंथरण्याचे प्रचंड मोठे कोट्यवधीचे बिल काढले गेलेले आहेत. सदर चे पाईप ठेकेदार नगरसेवक व अधिकारी यांनी संगनमताने काळ्याबाजारात भंगारमध्ये विकलेले तर नाहीत ना ?याचा शोध घ्यावा. कोपरगाव नगरपरिषदेने ४३ कोटी ६७ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे संपूर्ण पैसे अदा केले योजना पूर्ण झाल्याचा दाखला दिला परंतु खरंच पाईपलाईन अंतर लेत का याचा शोध घेणे जरुरी आहे ज्याची नगरपरिषदेच्या दप्तरात नोंद नाही त्याअर्थी मोठा भ्रष्टाचार आहे. मी आजवर याबाबत अनंत तक्रारी केलेल्या आहेत. परंतु त्या तक्रारींना आपण कचऱ्याची टोपली दाखविली, सदरच्या बाबत त्वरीत गंभीर दखल घ्यावी, अन्यथा मी न्यायालयात दावा दाखल करणार आहे याची नोंद घ्यावी असेही संजय काळे यांनी शेवटी पत्रात नमूद केले आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना भाजपाचे पराग  संधान म्हणाले, ४३.६७ कोटी च्या पाणी योजनेची संपूर्ण ट्रायल झाल्याशिवाय त्याचबरोबर ज्या ज्या भागात रस्ते खोदले, पाईप टाकले, नळ मीटर लावले,ही कामे झाली की नाही याबाबत तेथील नगरसेवकांचा न हरकत दाखला घेतल्याशिवाय ठेकेदाराचे अंतिम बिल काढू नये अशी मागणी असलेला अर्ज शिवसेना भाजप नगरसेवकांनी दिलेला असताना नगराध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी तीन कोटीचे बिल कुठलीही ट्रायल घेता सदर ठेकेदाराला संपूर्ण अदा केले गेल्या पाच वर्षापासून या योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करा सर्वसाधारण सभेत ठेवा अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत तसेच वेळोवेळी पत्रही दिले आहेत. परंतु नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी कधी हा विषय सर्वसाधारण सभेत घेतला नाही नाशिकचा कोणा तंत्रनिकेतन आखडून थर्ड पार्टीचा कंपिलेशनचा अहवाल घेतला असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्याप्रमाणे याची मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील मनसे व सर्वच पक्षांनी केली आहे. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी याला कधीच दुजोरा दिला नाही. विशेष म्हणजे या योजनेचे ९९ टक्के काम हे तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या काळात झालेले आहे. आमच्या माहितीप्रमाणे फिल्ट्रेशन प्लांट चे काम सुद्धा डिझाईन प्रमाणे झालेले नाही असा गौप्यस्फोटही   पराग संधान यांनी यावेळी केला.

कोपरगाव शहरवासीयांसाठी असलेली ४२ कोटी रूपये  खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामासंदर्भात नगरपालिकेची माहिती आणि योजनेची प्रत्यक्ष वस्तुस्थिती याबाबत विसंगती असल्याने या योजनेची चौकशी करून प्रकल्प अहवालानुसार योजनेचे काम झाले नाही.सदर योजना ही पाईपलाईन आराखडयाप्रमाणे झालेली नसल्याने १६ एमएलडी प्रमाणे पाणीपुरवठा होत नाही, योजनेसाठी ७ झोन असून सदयस्थितीत या सात झोनमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही. वितरीकांची जोडणी झालेली नाही, व्हाॅल टाकलेले नाही. दोन नवीन पंपाची आवश्यकता आहे, परंतु प्रत्यक्षात पंप कार्यान्वित नसल्याने शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला आहे, अनेक त्रुटी असतांनाही नगरपालिकेने ठेकेदाराला पुर्णत्वाचा दाखला कसा दिला हा प्रश्न असुन घाईघाईने बीलेही अदा करण्यात आल्याबददल संशय निर्माण होत आहे. तसेच एवढ्या मोठ्या रकमेचा निधी खर्च करून नगरपालीका योजना पुर्ण करण्याचा दावा करीत आहे.परंतु कागदपत्राद्वारे सदरची योजना पुर्ण झाल्याचे दाखवुन बीले अदा  केलेली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करावी,तसेच या योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट  करण्यात यावे, अशी मागणी  नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सभापती स्वप्नील निखाडे यांनी केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page