अनाथांचा नावाखाली देणग्या ऊकळण्याचा गोरखधंदा; गुन्हे दाखल करा

अनाथांचा नावाखाली देणग्या ऊकळण्याचा गोरखधंदा; गुन्हे दाखल करा

File a case of boiling donations in the name of orphans

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 18.20Pm.

कोपरगाव:अनाथ मुलांचे पालपोषण आणि त्यांना शिकविण्यासाठी आम्ही आश्रम चालवितो. पैसे दान करून हातभार लावा. देवीचे मोठे मंदिर आहे, भंडाऱ्यासाठी अन्नदान करा.असे सांगत आपल्या दरवाजावर कुणी येत असेल तर जरा जपून.ही टोळी खोट्या पावत्या बनवून लोकांकडून पैसे उकळत असल्याचे उघड झाले आहे. याबाबत श्री साई सेवा प्रतिष्ठान संस्थेने विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे तक्रार अर्ज केला असुन यात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश भोंगळ माहिती देतांना म्हणाले, निराधार लोककलावंत ऊस तोड मजुर, वीटभट्टी कामगार, गोरगरीब वंचित मुलांना ‘मला शिकायच’ या गोडंस नावाखाली देणगी गोळा करण्यासाठी फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीना संस्थेने ओळखपत्र धर्मादाय आयुक्त यांचा शिक्का नसलेले बनावट देणगी पावती पुस्तक संस्थेचे ध्येय उद्देश राबवलेले कार्यक्रम, मान्यवरांच्या भेटीचे फोटो, यांची फाईल दर महिन्यास ठराविक रक्कम घेवुन दिली जाते, संबंधीत व्यक्ती ह्या क्रेटा, बलेनो, स्विप्ट, स्काँर्पियो या अलीशान वाहनाने व नव्या को-या मोटार सायकलने राज्यातील सर्व जिल्ह्यात देणगी गोळा करण्यासाठी जातात. त्याचा पेहराव हातात गळ्यात धारण केलेले सोने, उंची राहणीमान हे कार्पोरेट क्षेत्राला ही लाजवेल असे असल्याने मधुर बोलण्यातुन समोरच्या व्यक्तीला संमोहित करत मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश, वह्या, पेन, कंपास, परिक्षा फि, आरोग्य सेवा, खर्च याबरोबर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, नाष्टा, मसाला, भाजीपाला, किराणा साठी एक दिवसापासुन महिनाभर खर्च होणाऱ्या रकमेची मागणी पाचशे पासुन काही हजारांच्या शुभ आकड्यांत असते यांच्या मधाळ बोलण्यावर विश्वास ठेवून अनेक जन सदविवेक बुद्धी गहाण ठेवत देणगी देतात. असेही त्यांनी सांगितले गृहिणी टार्गेट दरम्यान कुंटुबाची इत्यंभूत माहिती इतर सदस्य गोळा करतात, पती कामावर गेल्यानंतर दिवसभर घरी एकट्या राहणाऱ्या गृहिणी यांच्या टार्गेटवर असतात. अनाथ मुले अथवा देवाचे कारण पुढे केल्यास महिला सहज विश्वास ठेवत असल्याने या भामट्यांचे फावते. ग्रह पिडा, कालसर्प योग, राशीचक्र दोष, धर बंधन, भुत पिशाच्च यांची भिती कुंटुबास दाखवली जाते दोष निवारण्यासाठी पुजा, यज्ञ, सामुग्री, बुवा भगत यांच्या नावावर मोठी रक्कम लुबाडली जाते. असल्या फसवणूकी चे नांदगाव संगमनेर नाशिक औरंगाबाद जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पन्नास एकर बागायती जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा ही बंगला नसेल असे बंगले या लुटारू टोळ्यांनी राहता तालुक्यातील बाभळेश्वर व सुरेगाव या ठिकाणी बांधले असल्याचे श्री साई सेवा प्रतिष्ठान सांगण्यात आले आहे . तपासामध्ये पावतीमध्ये नमूद केलेला कोणताच अनाथ आश्रम प्रत्यक्षात नसल्याचे समोर आले. अशाप्रकारे अनेकांना चुना लावल्याचे उघड झाले आहे. तेंव्हा अशा या टोळ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक यांंनी विभागीय स्तरावरील सर्व पोलीस स्टेशनला द्यावेत असे तक्रार अर्जात नमुद केले आहे. अर्जावर अध्यक्ष रमेश भोंगळ सचिव राऊसाहेब मोरे आदी च्या सह्या आहेत.

चौकट

सेफ्टी दरवाजा बसवा,अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नका,पावती अगर इतर कागदपत्राबाबत शहानिशा करा,प्रसाद किंवा अन्य काही दिल्यास खाऊ नका,संशय आल्यास त्याची माहिती पोलिसांना द्या, अशोक सावधगिरीच्या सूचना अध्यक्ष रमेश भोंगळ यांनी केल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page