राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी समाधिस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी होळकर तर मठाधिपती पदी संत रमेश गिरी महाराज
Holkar as President of Rashtrasant Sadguru Janardan Swami Samadhisthan Trust and Sant Ramesh Giri Maharaj as Mathadhipati
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 18.50Pm.
कोपरगाव: येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधिस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी दत्तात्रय बाळकृष्ण होळकर मुळगाव ममनापूर तालुका खुलताबाद हल्ली राहणार औरंगाबाद यांची तर विश्वस्त व मठाधिपती पदी संत रमेश गिरी महाराज यांची सर्वानुमते आज निवड करण्यात आली.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी समाधी मंदिर लगेच झालेल्या छोटेखानी सभेत वरील निवड करण्यात आली निवडीनंतर अध्यक्ष होळकर व विश्वस्त रमेश गिरी बाबाजींची मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली, यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी फटाके फोडून गुलाल व फुले उधळून पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष होळकर म्हणाले संत जनार्दन स्वामींच्या सानिध्यात व नंतर मला कार्य करून ५३ वर्ष झाले आहेत, त्यांच्या सेवेचे हे फळ आहे. कोपरगाव समाधी स्थान आश्रमाच्या उपाध्यक्षपदी मी सहा वर्ष विश्वस्त म्हणून पंधरा वर्षापासून कार्यरत होतो. आगामी ट्रस्टचा कारभार नव्याने निवडलेले मठाधिपती संत रमेश गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली येथील ट्रस्टचा कारभार सर्वांना भाविकांना विश्वासात घेऊन केला जाईल. अध्यक्ष होळकर यांनी शाळेचे सचिव,प्राथमिक शाळा शिक्षक, तसेच मुख्याध्यापक म्हणूनही कार्य केले आहे. सध्या त्यांचे वय ७५ आहे शेवटच्या श्वासापर्यंत स्वामीजी च्या आदर्श तत्वावर भाविक भक्तांच्या अडी अडचणी सोडवून जनार्दन स्वामी चे कार्य सर्वदूर पर्यंत पोहोचण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी बोलताना दिली. तत्कालीन अध्यक्ष व विश्वस्त मोहनराव पिराजी चव्हाण यांचे नुकतेच निधन झाल्याने अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती .त्यांच्या जागी हजारो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संत रमेश गिरी महाराज यांची मुख्य विश्वस्त म्हणून निवड व्हावी ही अनेक भक्तांची इच्छा होती. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या महानिर्वाणानंतर संत रमेश गिरी महाराज यांनी आश्रमात जबाबदारी स्वीकारली होती. त्यांची निवड झाल्याने भाविक भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. उपाध्यक्षपदासाठी पुढील काही दिवसात निवड केली जाणार आहे.
नव्याने विश्वस्त पदी निवडले गेलेल्या मध्ये सर्वश्री विलास कोते (शिर्डी) अनिल जाधव (औरंगाबाद) सुभाष शिंदे (कोपरगाव बेट) संदीप चव्हाण (जेऊर कुंभारी तालुका कोपरगाव) राम कृष्ण कोकाटे (कारवाडी) अतुल शिंदे (नाशिक) अंबादास अंत्रे (कोपरगाव) भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक) यांची ही सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हजारो भाविक भक्तगण या वेळी उपस्थित होते.
चौकट.
नव्याने निवडलेले विश्वस्त व मठाधिपती संत रमेश गिरी महाराज गेल्या तीन वर्षापासून मौन धारण करून आहेत त्यांची दिनचर्या त्यांची कुटी ते समाधी मंदिर बाबाजींची सेवा असा रोजचा दिनक्रम सुरू आहे.नुकताच भाविक भक्तांनी त्यांचा वाढदिवसही जल्लोषात साजरा केला होता.